News Flash

वैमानिकाचं हटके प्रपोजल, गोठलेल्या तलावावर चार तास मेहनत करून लिहले ‘Marry Me’

असा सुखद धक्का कोणाला नाही आवडणार

ही अक्षरं २५ फूट मोठी होती.

वैमानिकाचं प्रशिक्षण घेणाऱ्या एका तरुणानं आपल्या गर्ल फ्रेंडला हटके पद्धतीनं मागणी घातली आहे. गोठलेल्या तलावाच्या पृष्ठभागावर अक्षर कोरुन त्यानं आपल्या गर्ल फ्रेंडला प्रपोज केलं आहे. या भन्नाट प्रपोजलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गैविन बेकर असं या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याचं नाव आहे. गैविननं आपल्या कुटुंबियांच्या मदतीनं गोठलेल्या तलावावर ‘हार्ट’ आकार कोरून ‘मॅरी मी’ असं लिहिलं होतं. ही अक्षरं २५ फूट मोठी होती. हे हटके प्रपोजल बर्फावर कोरायला त्याला ४ तास लागले. त्यानंतर आपली प्रेयसी ऑलिवियाला हिला हॅलिकॉप्टरमध्ये बसवून त्यानं ठराविक उंचीवर तिला नेलं. तिथून खाली पाहिल्यावर  गैविननं गोठलेल्या तलावात कोरलेलं प्रपोजल तिला दिसलं. मग काय क्षणाचाही विलंब न करता ऑलिवियालानं ताबडतोब गैविनला होकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 11:49 am

Web Title: aviation student proposes marry me on frozen lake
Next Stories
1 …म्हणून या शहरात राहतात केवळ ४ माणसे
2 Viral Video : फेडररपुढे महिला टेनिसपटूंचं चालेना, व्हिडिओ व्हायरल
3 नेतान्याहू यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कचऱ्याचे डब्बे उलटे केले
Just Now!
X