11 December 2017

News Flash

स्वत:वर शस्त्रक्रिया सुरू असताना ‘ती’ चक्क ‘बाहुबली-२’ पाहत होती

या सर्जरीला डॉक्टरांनी 'बाहुबली सर्जरी' असं नाव दिलं.

मुंबई | Updated: October 7, 2017 10:20 AM

९० मिनिटे चाललेल्या या सर्जरीला डॉक्टरांनी 'बाहुबली सर्जरी' असं नाव दिलं.

आंध्र प्रदेशमधील गुंटूर शहरातील तुलसी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक अनोखी शस्त्रक्रिया पार पडली. डॉक्टर शस्त्रक्रिया करत असताना रुग्ण चक्क ‘बाहुबली २’ चित्रपट पाहत होती.

व्यवसायाने नर्स असलेल्या ४३ वर्षीय विनया कुमारी यांना ब्रेन ट्युमर झाला होता. काही दिवसांपूर्वी चक्कर येऊन त्या पडल्या. तपासणी केल्यानंतर ब्रेन ट्युमर झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यांच्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. तुलसी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील न्यूरोसर्जनच्या टीमने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान विनया यांनी शुद्धीत राहणं जास्त गरजेचं होतं, तेव्हा तिचं मन गुंतवून ठेवण्यासाठी डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये चक्क बाहुबली चित्रपट दाखवला. यासाठी तिच्या बेडवर लॅपटॉपची व्यवस्था करण्यात आली होती.

डॉक्टर शस्त्रक्रिया करत होते त्यावेळी घाबरून न जाता विनया मात्र चित्रपटाचा आनंद घेत होती. तिच्या योग्य प्रतिसादामुळे डॉक्टरांच्या चमूला तिच्यावर उपचार करणं अधिक सोपं गेलं. ९० मिनिटे चाललेल्या या सर्जरीला डॉक्टरांनी ‘बाहुबली सर्जरी’ असं नाव दिलं.

वाचा : गावकऱ्यांनी चक्क भलामोठा अजगर तळून खाल्ला!

वाचा : ओला कॅबमध्ये महिलेची प्रसूती; कुटुंबाला कंपनीकडून स्पेशल गिफ्ट

First Published on October 7, 2017 10:20 am

Web Title: baahubali helped a patient keep awake during surgery