भारताची प्रसिद्ध कुस्तीपटू बबिता फोगट ही रविवारी विवाहबद्ध झाली. भारत केसरी विजेता पैलवान विवेक सुहाग याच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे तिने या लग्नात सातऐवजी आठ फेरे घेऊन एक आदर्श निर्माण केला. बबिता आणि विवेक एकमेकांना पाच वर्षांपासून ओळखतात. दोघांची भेट दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी आपापल्या कुटुंबीयांना आपल्या नात्याविषयी कल्पना दिली. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी जून महिन्यात त्यांचा विवाह निश्चित केला. रविवारी हरयाणातील बलाली या गावी बबिता आणि विवेक यांचा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह पारंपरिक पद्धतीने आणि अतिशय साधेपणाने पार पडला. या लग्नात फक्त २१ वऱ्हाडी उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

#sistermarriage #babitaphogat #phogatfamily #phogatsisters #sabyasachioutfit

A post shared by Geeta PhogatPawan Saroha (@geetaphogat) on

सामान्यत: लग्नाच्या वेळी लग्नात सात फेरे घेतले जातात, मात्र या लग्नात वधू-वरांनी आठ फेरे घेतले. त्यातील आठवा फेरा घेताना ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा संदेश त्यांनी दिला. हा विवाह खासगी पद्धतीने झाला. या विवाहाचा स्वागत सोहळा सोमवारी सायंकाळी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये झाला.

कुस्तीच्या खेळात पुरुषांच्या बरोबरीने उतरत या खेळावर आपलं वर्चस्व सिद्ध करणाऱ्या ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बबिता फोगाट हिच्या जीवनातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. कुस्ती या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्व करणारी बबिता फोगाट हिने कुस्तीपटू विवेक सुहाग याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. बलाली या गावी, अतिशय स्तुत्य अशा विचाराने पार पडलेल्या या विवाहसोहळ्याची साऱ्या क्रीडा विश्वात आणि नजीकच्या गावांमध्ये बरीच चर्चा सुरु आहे. बबिता आणि विवेक हे त्यांच्या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने सुरेख पेहरावामध्ये दिसले. यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या लग्नातील लेहंग्याप्रमाणे अगदी मिळताजुळता लेहंगा बबिताने घातला होता. तर, विवेकने साजेशी शेरवानी घातली होती.