सध्या संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढतो आहे. केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउनमध्ये वाढ केलेली असून वैद्यकीय यंत्रणाही या विषाणूवर लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर करोना विषयी कोणतीही खोटी माहिती पसरवणं कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेलं आहे. तरीही सोशल मीडियावर काही प्रतिष्ठीत मंडळी करोनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.

भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या तबलिघी जमातच्या कार्यक्रमावर निशाणा साधत, एक वादग्रस्त ट्विट केलं.

यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी बबिता फोगटचं अकाऊंट सस्पेंड करण्याची मागणी केली.

तर काही नेटकरी बबिताच्या समर्थनार्थ मैदानात उतरले…

एका नेटकऱ्याने थेट बबिताच्या खेळाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करुन तिच्या ट्विटरवर टीका केली.

या ट्विटरला बबिताचे सहकारी बजरंग पुनिया आणि योगेश्वर दत्त यांनीही तितकच सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

दिल्लीत झालेल्या तबलिघींच्या कार्यक्रमाला देशभरातील अनेक मुस्लिमांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर करोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचं पहायला मिळालं. दरम्यान प्रत्येक दिवशी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकार अजुनही या परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकलेलं नाही.