News Flash

Baby Elephant Video: गटागटा पाणी पिताना हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ व्हायरल; एकदा पहाच…

माणूस आपल्या माणुसकीला कधी कधी विसरतो. मात्र, असे असले तरी जनावरांबाबत आपली उदारमता तो दाखवतो. असाच एक मनाला भावणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

baby-elephant-gets-fed-through-bottle-by-keeper
(Twitter/@SheldrickTrust)

सध्या सर्वत्र करोना आणि लॉकडाउनच्याच चर्चा सुरु आहेत. लोकं वाढती रुग्ण संख्या पाहून काहीसे घाबरले आहेत. तर काही लोकांना आता या लॅाकडाउन आणि निगेटिव्ह बातम्याचा कंटाळा आला आहे. अशातच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. लोकं त्याला खूप पसंती दाखवत आहेत. या व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये एक रखवालदार हा हत्तीच्या पिल्लूला बॉटलने पाणी पाजत त्याची तहान तहान भागवण्याचा प्रयत्न करतोय.

हत्तीला पिल्लाचा हा मनाला भावणारा व्हिडीओ शेल्ड्रिक वन्यजीव ट्रस्टने त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. माणूस आपल्या माणुसकीला कधी कधी विसरतो. मात्र, असे असले तरी जनावरांबाबत आपली उदारमता तो दाखवतो. असंच काहीसं चित्र या व्हिडीओमध्ये दिसून येतंय. एक रखवालदाराने जंगलातील हत्तीच्या पिल्लाला अगदी त्याच्या आईप्रमाणेच त्याला खाऊ घातलं. या व्हिडीओमधला हत्तीचा पिल्लू अनाथ असल्याचं म्हटलं जातंय. जंगलातील अशा हत्तीच्या अनाथ पिल्लांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पोषण आहार पुरवला जातो. जेवण केल्यानंतर या हत्तीच्या पिल्लाला तहान लागली होती.

आणखी वाचा : चक्क खड्ड्यांमधून महिलांनी केलं कॅटवॉक; लोक बघतच बसले!

तहानलेल्या या पिल्ला जंगलातील रखवालदाराने बाटलीने पाणी पाजलं. तहानलेल्या या हत्तीच्या पिल्लाने सुद्धा गटागटा पाणी प्यायलं. याचा व्हिडीओ शेल्ड्रिक वन्यजीव ट्रस्टने त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला. त्यानंतर या हत्तीच्या पिल्लाचा हा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. हा व्हीडिओ अनेक नेटीझन्सच्या पसंतीस पडला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.

शेल्ड्रिक वन्यजीव ट्रस्टने हा व्हिडीओ ६ सप्टेंबर रोजी शेअर केला होता. या व्हिडीओला शेअर करून एक दिवस उलटला नाही तर आतापर्यंत याला २,००० हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. अनेक लोकांनी तर या हत्तीच्या पिल्लावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे तहानलेल्या हत्तीच्या पिल्लाला पाणी पाजणाऱ्या रखवालदाराचं कौतुक देखील करण्यात येतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2021 5:49 pm

Web Title: baby elephant gets fed through bottle by keeper video is making tweeple smile prp 93
Next Stories
1 साप कसा पकडू नये? जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पाहाच
2 ‘बॉर्डरचा राजा’; मुंबईहून गणपती बाप्पा निघाले जम्मू-काश्मीरला; जाणून घ्या यामागची रंजक गोष्ट
3 ISRO: चांद्रयान -२ रिमोट सेन्सिंगद्वारे हाती लागली महत्वाची माहिती; भारतीय शास्त्रज्ञांनी केला खुलासा
Just Now!
X