ट्विटरला सध्या #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. ठाकरे सरकारची मुघल राजशी तुलना करणाऱ्या एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी ट्विटर युजर समीत ठक्कर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. पण यामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत का आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आदित्य ठाकरेंशी काय संबंध?
झालंय असं की, समीत ठक्कर याने ट्विटला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. १ जुलै रोजी करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नव्या काळातील औरंगजेब असा केला असून आदित्य ठाकरे यांना मोहम्मद आझम शाह उर्फ बेबी पेंग्विन असं म्हटलं आहे.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
future players in indian cricket team
विश्लेषण : टीम इंडिया ‘जनरेशन नेक्स्ट’ कशी असेल?
Brother crying at her sister wedding bidai
VIDEO : “..आणि मला माफ कर..” बहिणीला निरोप देताना भाऊ ढसा ढसा रडला, सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट, व्हिडीओ व्हायरल
Marathi Bhasha Din 2024 Funny Video On Marathi Language Day Maharashtrachi Hasyajatra
“भाषेचा माज नाही आदर असावा तेव्हा ती समृद्ध होते”; हास्यजत्रेमधील व्हायरल VIDEO एकदा पाहाच

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीनंतर व्ही पी रोड पोलीस ठाण्यात बदनामीचा तसंच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून समीर ठक्करला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. नागपूरचा रहिवासी असलेल्या समीर ठक्कर याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासहित ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावरही आक्षेपार्ह शब्दात टीका केली असूनत सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते.

समीर ठक्करचं काय म्हणणं आहे –
पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर समीर ठक्कर याने आपली बाजू मांडताना, “आपण फक्त कठोर भाषेचा वापर केला असून हे असंवैधानिक नाही. जर माझी पोस्ट आक्षेपार्ह होती तर ट्विटने ती काढली का नाही ? सरकारवर टीका करण्याच्या माझ्या लोकशाही अधिकाराचा मी वापर केला आहे,” असं म्हटलं आहे.

“व्ही पी रोड पोलिसांनी संपर्क साधला असता मी लॉकडाउन संपल्यानंतर पोलीस स्टेशनला येऊ शकतो असं कळवलं असून पोलीस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांना ईमेल करुन जबाब पाठवला आहे,” अशी माहिती समीर ठक्करने दिली आहे.