21 September 2020

News Flash

‘त्या’ बकऱ्याची किंमत ऐकून खरेदीदार चक्रावले

कोणीही बकरा खरेदी करेना

(छाया सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस )

देशभरात आज बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे. ‘ईद-उल-अजहा’ किंवा ‘ईद-उज-जुहा’ च्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. त्यानुसार भारतात मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात.साहजिकच या काळात बकऱ्यांचा भाव नेहमीपेक्षा वधारतो. अनेक ठिकाणी कुर्बानीच्या बकऱ्यांची बोलीही लावली जाते. यापैकी काही बकऱ्यांची किंमत तर लाखोंच्या घरात असते. मात्र, तरीही अनेकजण हौसेखातर हे बकरे खरेदी करतात. मात्र, यंदा अजमेरमधील बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्यात आलेल्या बकऱ्याची किंमत ऐकून अनेकजण चक्रावले. अव्वाच्या सव्वा किंमतीमुळे शेवटपर्यंत हा बकरा विकलाच गेला नाही. त्यामुळे गोपाळराव आणि कपिल सोहिल या बापलेकांना रिकाम्या हातानेच घरी परतावे लागले.

कपिल यांनी कुर्बानीच्या बकऱ्याची विक्री किंमत १ कोटींहून अधिक ठेवली होती. परंतु एवढ्या चढ्या किंमतीमुळे त्यांचा बकरा कोणीही खरेदी केला नाही. ‘अल्ला वाला बकरा’ म्हणून ओळखला जाणारा हा पांढऱ्या रंगाचा बकरा काही कारणांमुळे खास आहे. या बकऱ्याच्या पाठीवर अरबीमध्ये ‘अल्ला’ लिहिले आहे. जन्मल्यापासून या बकऱ्याच्या पाठीवर ही खूण आहे म्हणूनच सोहिल कुटुंबियांनी या बकऱ्याची किंमत १ कोटी ठेवली होती. पण बकरी ईदच्या आदल्या दिवशीपर्यंत या बकऱ्याला कोणीही खरेदीदार मिळालाच नाही. शेवटी या बकऱ्याला घेऊन रिकाम्या हातानं या बाप लेकांना अजमेरमध्ये परतावं लागलं. खरेदीदार न मिळाल्यानं या बकऱ्याची किंमत घटवून त्यांनी ५१ लाखांपर्यंत आणली आणली आहे, तेव्हा आता तरी या बकऱ्याला खरेदीदार मिळेल अशी आशा या कुटुंबियांना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 10:28 am

Web Title: bakri eid 2017 allah wala bakra has no buyers because of high price
Next Stories
1 VIDEO : विस्की पिणारा रेडा कधी पाहिलात का?
2 बँक खातेधारकांनो, तुमच्या ‘या’ अधिकारांची माहिती करून घ्या!
3 Viral Video : चक्रीवादळातून मार्ग काढत पायलटनं केलं सुखरुप लँडिंग
Just Now!
X