एकाच विमानातून प्रवास करत असताना स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरानं पत्रकार अर्णब गोस्वामी यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडीओही कुणालनं ट्विट केला होता. त्याच्या या वागण्यावर कंपन्यांनी आक्षेप घेत इंडिगो, एअर इंडिया, स्पाईस जेट आणि गो एअर हवाई वाहतूक करणाऱ्यांनी त्यांच्यावर बंदी घातली. हा मुद्द्यावर सोशल मीडियात जोरात चर्चा सुरू असून, मीम्सही व्हायरल होऊ लागले आहेत. खळखळून हसायला लावणारे काही भन्नाट मीम्स…