22 October 2020

News Flash

उघड्या गटाराला पोलिसाने दगडाने झाकलं, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

'अजूनही काही चांगले लोक समाजात आहेत हे पाहून बरं वाटतं'

उघड्या गटारावर मोठा दगड ठेवून झाकणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बंगळुरु शहरातील हा फोटो असून कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पोलीस कॉन्स्टेबल उघड्या गटारावर दगड ठेवतो. एचएसआर लेआऊट पोलीस स्टेशनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर गिरीश एम यांचा हा फोटो शेअर केला आहे. उघड्या गटारामुळे किती मोठी दुर्घटना होऊ शकते याची प्रचिती मुंबईत आली आहे. गोरेगावमध्ये दोन वर्षांचा मुलगा गटारात पडून बेपत्ता झाला आहे.

रविवारी रात्री गिरीश एम गस्तीवर होते. यावेळी एचएसआर येथील तिसऱ्या सेक्टरमध्ये आपल्या गाडीवर असताना त्यांनी एक महिला आणि लहान मुलगा उघड्या गटाराच्या बाजूने गेल्याचं पाहिलं. यावेळी त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांची वाट न पाहिली नाही आणि पुढे सरसावले. त्यांनी एक मोठा दगड आणला आणि त्या उघड्या गटारावर ठेवला.

७ जुलै रोजी करण्यात आलेलं हे ट्विट अनेकांनी रिट्विट केलं असून ४०० हून अधिक जणांनी लाईक केलं आहे. अनेकांनी गिरीश यांचं कौतुक केलं असून अजूनही काही चांगले लोक समाजात आहेत हे पाहून बरं वाटतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान काही जणांनी महापालिकेवर टीका केली असून आपली जबाबदारी योग्य न पाडल्याप्रकरणी सुनावलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 1:03 pm

Web Title: bangalore police constable covers open manhole praises on social media sgy 87
Next Stories
1 अबब ! तीन हजार फूट उंचीवर त्यानं प्रेयसीला केलं प्रपोज
2 VIDEO: ‘सचिन, द्रविड, लक्ष्मण स्लेजिंग करायचे का?’, गांगुलीने दिले हे मजेदार उत्तर
3 शिमल्यामधील मोदींचे आवडते रेस्टॉरंट झाले बंद, गुलाबजामसाठी होते लोकप्रिय
Just Now!
X