26 November 2020

News Flash

Social Viral : घोड्यावरुन ऑफिसला जात साजरा केला नोकरीचा शेवटचा दिवस

ऐकावे ते नवलच

आपण करत असलेली नोकरी सोडणे आणि नवीन ठिकाणी जॉईन होणे यात काहीच वेगळे नाही. कधी पगाराच्या कारणास्तव तर कधी इतर काही कारणानी नोकरी सोडणारे अनेक जण असतात. मग त्या व्यक्तीचा ऑफिसमधला शेवटचा दिवस त्याच्यासाठी आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी कायमच खास असतो. आपल्यातील एक व्यक्ती सोडून जाणार म्हणून दु:ख तर व्यक्त केले जातेच पण हा दिवस नोकरी सोडणाऱ्याच्या लक्षात रहावा यासाठी काहीतरी खास प्लॅनही केले जाते. पण आपल्याच शेवटच्या दिवशी काहीतरी खास करणारे फारच कमी असतात.

आता हेच पाहा ना, बंगळुरुमधील EGL या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या रुपेश कुमार वर्मा यांनी एक खास गोष्ट केली आहे. आपल्या ऑफिसच्या शेवटच्या दिवशी ते ऑफिसला चक्क घोड्यावरच गेला. त्याचा अशाप्रकारे घोड्यावर ऑफिसला गेल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी रुपेश यांनी आपली नोकरी सोडली आहे. आता घोडा घेऊन ऑफिसला येण्यामागचे कारण काय? तर शहारत वाढलेल्या ट्रॅफीकचा निषेध करण्यासाठी आपण असेल यांनी सांगितले. त्यानंतर ते म्हणाले, ट्रॅफीकला वैतागून मी घोडेस्वारी शिकलो असेही त्यांनी सांगितले.

निळा शर्ट आणि पँट तसेच शूज असे फॉर्मल कपडे घातलेल्या रुपेश यांनी पाठीवर ऑफीस बॅगही घेतल्याचे या व्हिडियोमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे या घोड्यावर त्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करण्याचा शेवटचा दिवस अशी पाटीही त्याने लावली आहे. रुपेश यांच्या या अनोख्या उपक्रमासाठी अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. तर काहींनी त्यांची खिल्लीही उडवली आहे. ट्विटरवर काहींनी रुपेश यांचे घोड्यावरील फोटो तर काहींनी घोड्यावरुन जातानाचे व्हिडियो शेअर केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2018 6:32 pm

Web Title: bangalore software engineer rides horse to office on his last working day
Next Stories
1 पूरग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या IAS अधिकाऱ्याच्या जिद्दीला सलाम!
2 ऐकावं ते नवल! यांना कडाक्याच्या थंडीत फुटतो घाम, तर उन्हाळ्यात वाजते थंडी
3 उत्तुंग इमारतीवर चढला तरी कसा? पाहा इटुकल्या प्राण्याची आभाळाएवढी हिंमत
Just Now!
X