बांगलादेशमधील एका मुस्लीम धर्मगुरुने फेसबुकवरील हाहा इमोजीविरोधात फताव काढला आहे. सोशल नेटवर्किंगवर प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या या धर्मगुरुने फेसबुकवर लोकांची खिल्ली उडवण्यासाठी इमोजी वापरला जात असल्याचं कारण दिलं आहे.

अब्दुल्ला असं या धर्मगुरुचं नाव आहे. त्यांचे फेसबुक आणि युट्यूबवर ३० लाख फॉलोअर्स आहेत. मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या बांगलादेशमध्ये अब्दुल्ला अनेकदा टीव्ही कार्यक्रमांमध्ये धार्मिक विषयांवर भाष्य करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून सहभागी होतात. शनिवारी त्यांनी फेसबुकवर तीन मिनिटांचा एका व्हिडीओ पोस्ट केला होता. फेसबुकवर लोकांची खिल्ली उडवण्यासंदर्भातील विषयावर ते या व्हिडीओमध्ये बोलले आणि त्यांनी एक फतावा जारी केला. फेसबुकवरुन एखाद्याची खिल्ली उडवणे हे इस्लामनुसार ‘हराम’ असून मुस्लिमांनी ते करु नये असं या व्हिडीओत अब्दुल्ला म्हणालेत.

नक्की पाहा >> Top 10 Most Valuable Brands In India 2021: महिंद्रा नवव्या, रिलायन्स चौथ्या तर टाटा…

“सध्याच्या दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेकजण हे फेसबुकवरील हाहा इमोजीचा लोकांची खिल्ली उडवण्यासाठी वापर करतात,” असं या व्हिडीओमध्ये अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओही व्हायरल झाला असून त्याला २० लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. “जर आपण एखाद्या व्यक्तीने पोस्ट केलेल्या मजेदार कंटेटंवर हा इमोजी वापरला आणि तो मजकूर खरोखरच विनोदी असेल तर हरकत नाही. मात्र तुम्ही एखाद्या व्यक्तीची खिल्ली उडवण्यासाठी त्याला बदनाम करण्यासाठी हाहा इमोजी वापरत असाल किंवा कमेंट करत असला तर हे इस्मामनुसार पूर्णपणे चुकीचं आहे. देवाचं नाव घेऊन मी तुम्हाला विनंती करतो की असं करुन नका. एखाद्याची खिल्ली उडवण्यासाठी हाहा इमोजी वापरुन नका. तुम्ही एखाद्या मुस्लीम व्यक्तीला दुखावलं तर तो वाईट भाषा वापरुन तुम्हाला उत्तर देऊ शकतो,” असं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Photos: अबब… काही किलोमीटरपर्यंत पसलं आहे हे कोळ्यांचं जाळं; जाणून घ्या नक्की काय घडलंय

या व्हिडीओवर हजारो जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना हा मुद्दा पटला असला तरी बऱ्याच जणांनी या व्हिडीओवरही हाहा इमोजी वापरुन प्रतिक्रिया दिलीय. अब्दुल्ला हे बांगलादेशमधील तरुण धर्मगुरुंपैकी एक असून त्यांची सोशल नेटवर्किंगवर खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. सामाजिक विषय आणि धार्मिक विषयांवर त्यांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात आणि लाखो लोकं ते पाहतात.