22 April 2019

News Flash

ऑफिसमध्ये शेवटच्या दिवशी स्पायडरमॅनच्या वेशात पोहोचला बँक कर्मचारी

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

राजीनामा दिल्यानंतर कंपनीतील शेवटचा दिवस लक्षात राहावा यासाठी अनेकजण वेगवेगळ्या कल्पना वापरतात. काहीजण पार्टी करतात तर काहीजण आठवण म्हणून आपल्या सहकाऱ्यांना भेटवस्तू देतं. पण ब्राझीलमधील एका बँक कर्मचाऱ्याने आपण कधीही विचार केला नसेल अशा पद्धतीने आपला शेवटचा दिवस साजरा केला. कामाच्या शेवटच्या दिवशी हा कर्मचारी चक्क स्पायडरमॅनच्या वेशात ऑफिसमध्ये पोहोचला. इतकंच नाही तर त्याने तसंच दिवसभरातील कामही पूर्ण केलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

51 सेकंदांच्या या व्हिडीओत कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. तसंच प्रत्येकाला काहीतरी देतानाही दिसत आहे. कदाचित शेवटचा दिवस असल्याने तो गोड पदार्थ वाटत असावा. पण हे सगळं करत असताना तो स्पायडरमॅनच्या वेशातच असतो.

यावेळी एका कर्मचाऱ्याने त्याला मिठीही मारली. आपल्या या सहकाऱ्याचं अप्रूप वाटणारे काहीजण मोबाइलमध्ये सगळं रेकॉर्ड करत असल्याचंही दिसत आहे.

First Published on January 30, 2019 6:37 am

Web Title: banker attends office in spider man costume to mark last day