25 February 2021

News Flash

फेकन्युज : ओबामांच्या तोंडी

भारतातील राजकीय वातावरणातील बदल पाहता राहुल गांधी यांना जगभरातील नेत्यांकडून मान्यता मिळत आहे

खोटे विधान

 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भारताचे आगामी पंतप्रधान असतील, हे अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेले विधान पूर्णत: खोटे आहे. भारतातील राजकीय वातावरणातील बदल पाहता राहुल गांधी यांना जगभरातील नेत्यांकडून मान्यता मिळत आहे आणि २०१९ मध्ये राहुल हे देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेले असतील, अशा आशयाचा मजकूर ‘व्हॉटसअ‍ॅप’ आणि ‘फेसबुक’वर प्रसारित झाला आहे. मात्र याची शहानिशा करण्यात आल्यानंतर निदर्शनास आले की, ओबामा यांनी त्यांच्या अलीकडील कोणत्याच वक्तव्यात राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. विशेष म्हणजे राहुल आणि ओबामा यांच्या भेटीविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत; परंतु त्या २०१६ आणि २०१७ मधील आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ओबामा यांनी पंतप्रधानविषयी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे ओबामा यांच्या तोंडी खोटी विधाने चिकटवून राजकीय मत अजमावण्याचा प्रयत्न समाजमाध्यमांवर केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 12:32 am

Web Title: barack obama fake news
Next Stories
1 सुरक्षित चिंब भटकंती
2 खाद्यवारसा : उपवासाची दाण्याची आमटी
3 सुंदर माझं घर : रंगीत सॅटिन बो
Just Now!
X