लॉटरीच्या तिकीटावर दहा वीस हजारांपासून कोट्यवधीची रक्कम बक्षीस म्हणून दिलेली तुम्ही पाहिली असेल. पण आसामच्या बरपेटा जिल्ह्यातील कलगछिया गावात अजब लॉटीरीचा खेळ रंगला. इथे विजेत्याला रोख रक्कम नाही कर गाय, कोंबडी, बदक, मासे बक्षीस म्हणून देण्यात आले.

Viral Video : मेघालयच्या मुख्यमंत्र्यांची विरोधकांसोबत सांगितिक जुगलबंदी

Viral : कॉपीला आळा घालण्यासाठी चिनी शिक्षकांनी शोधला रामबाण उपाय

नववर्षांच्या स्वागतासाठी या गावात लॉटरीचा हा छोटासा खेळ ठेवण्यात आला होता. यात लॉटरी जिंकणा-या पहिल्या विजेत्याला गाय, दुस-या विजेत्या बकरी आणि बदक, तिस-या विजेत्याला कोंबडी आणि उत्तेजनार्थ म्हणून मासे देण्यात आले. आतापर्यंत लॉटरीचे तिकीट जिंकणा-या विजेत्यास बक्षीस म्हणून ठराविक रोख रक्कम दिली जाते पण या गावक-यांनी मात्र अशा छोट्याशा गोष्टीतही आपला आनंद शोधला. या लॉटरीच्या खेळाला गावक-यांनी मोठी गर्दी केली होती. आपण कोंबडी, बदक, मासे यांपैकी काहीना काही तरी जिंकूच या आशेने गावक-यांनी तिकीट घेण्यासाठी लांबलचक रांगा लावल्या होत्या.

वाचा : माकड पकडा आणि दरमहा १८ हजार कमवा