22 October 2019

News Flash

BCCI ने पोस्ट केला शास्त्री-द्रविडचा फोटो, नेटकरी म्हणतात; ‘यात तर एकच दिग्गज दुसरा कुठे?’

रवी शास्त्री आणि द्रविडची तुलना नेटकऱ्यांना फारशी न आवडल्याने शास्त्री झाले ट्रोल

राहुल द्रविड आणि रवी शास्त्री

सोशल मिडियावर सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर चर्चा सुरु असते. यामध्ये कधी महत्वाची घटना किंवा कोणाला तरी ट्रोल करणे किंवा इतर काही निमित्ताने वेगवेगळ्या गोष्टी कायमच चर्चेत असतात. अशीच चर्चा सध्या इंटरनेटवर रंगली आहे ती बीसीसीआयने पोस्ट केलेल्या एका फोटोवरुन.

बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा फोटो ट्विट केला. या फोटोला बीसीसीआयने ‘जेव्हा भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज एकमेकांना भेटतात,’ अशी कॅप्शन दिली आहे. मात्र नेटकऱ्यांना द्रविडची तुलना रवी शास्त्रींशी केलेलं फारसं आवडलेलं नाही. त्यामुळेच या पोस्टखाली अनेकांनी यासंदर्भात आक्षेप नोंदवला आहे. तर काहींनी रवी शास्त्री आणि बीसीसीआयला ट्रोल करणारे मजेदार रिप्लाय केले आहेत.

पाहुयात काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे…

१)
दुसरा दिग्गज कोण?

२)
रवी शास्त्री?

३)
भारतीयांना हवा असणारा प्रशिक्षक आणि…

४)
किती वाईट माणूस आहे मी

५)
दुसरा कोण?

First Published on September 20, 2019 1:56 pm

Web Title: bcci shares photo of rahul dravid and ravi shashtri together twitter trolls shashtri scsg 91