04 March 2021

News Flash

Video : आगीतून वाचवले अस्वलाच्या पिल्लाचे प्राण; पुढे जे झालं ते वाचून व्हाल भावूक

प्राणी त्यांचं प्रेम कृतीतून व्यक्त करत असतात

प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येक वेळी शब्दांचीच गरजं असते असं कुणी सांगितलंय? प्रेम व्यक्त करण्यासाठी भावना महत्त्वाच्या असतात आणि त्या व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. आपल्या कृतीतून, डोळ्यातून त्या व्यक्त होत असतात. माणसांना बोलता येतं त्यामुळे ते त्यांचं प्रेम सहज व्यक्त करु शकतात. मात्र प्राणी त्यांचं प्रेम कृतीतूनच व्यक्त करतात. त्यांच्या कृतीतून त्यांचं निरागस प्रेम, आपुलकी, आदर, काळजी हे सारं काही व्यक्त होत असतं. सध्या सोशल मीडियावर अस्वलाच्या पिल्लाचा असाच एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

एका व्यक्तीने या पिल्लाचे आगीतून प्राण वाचवले. त्यानंतर हे लहान पिल्लू ज्या पद्धतीने या व्यक्तीप्रती आभार, प्रेम व्यक्त करत होता. ते पाहून सहज डोळ्याच्या कडा पाणावतील. व्हायरल होत असलेला व्हिडीओ ज्युली मेरी कॅपीएलो या युजरने ट्विटवर शेअर केला आहे.

एका जंगलात लागलेल्या आगीमधून एका व्यक्तीने अस्वलाच्या लहान पिल्लाचा जीव वाचवला. त्या सुखरुपरित्या आगीतून बाहेर काढलं. विशेष म्हणजे प्राण वाचवल्यानंतर या पिल्लाने जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचा पाय घट्ट धरुन ठेवला. या व्यक्तीने पिल्लाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे पिल्लू त्याला सोडायला तयार नव्हतं. इतकंच नाही तर नंतर हे पिल्लू या व्यक्तीच्या कडेवर जाऊन बसलं आणि बराच वेळा त्याच्यासोबत खेळत राहिलं,अगदी एखाद्या लहान मुलाप्रमाणे. त्याच्या या वागण्यामुळे उपस्थित सारेच भावूक झाले.

वाचा : रितेश-जेनेलियाच्या प्रेमाचा ‘लातूर पॅटर्न’; शेतातील व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, १ जानेवारी रोजी शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरत आहे. आतापर्यंत त्याला ६८ हजारपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तर ५ हजारपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 12:57 pm

Web Title: bear cub rescued from fire then refuses to let go of man heartwarming video is viral ssj 93
Next Stories
1 Video : एकदम झकास…! आजीबाईंच्या डान्सवर आनंद महिंद्रा खूश
2 चमत्कार… विधवा झालेल्या पत्नीला सहा वर्षानंतर भेटला पती
3 अभिमानास्पद! आयपीएस अधिकाऱ्याने सफाई कर्मचाऱ्यांकडून लावून घेतले स्टार
Just Now!
X