अनेक स्पर्धा, कार्यक्रमात स्टेजवर सर्रास आगीचे खेळ खेळले जातात, पण एक छोटीशी चूक किती महागात पडू शकते याचं जिवंत उदाहरण एल साल्वाडोर येथे आयोजीत करण्यात आलेल्या सौंदर्यस्पर्धेत पाहायला मिळालं. या स्पर्धेत भाग घेतलेली सौदर्यवती पिसांचं मुकुट परिधान करून स्टेजवर आली. हे मुकुट आकारानं खूपच मोठं होतं. रॅम्पवर येत असताना तिच्या शेजारी उभ्या असलेल्या इतर मॉडेल्सच्या पेटत्या मशालीचा स्पर्श तिच्या मुकूटाला झाला आणि काही सेकंदात पिसांच्या मुकुटानं पेट घेतला.

स्टेजवर असलेल्या आयोजकांच्या ही बाब लक्षात आली, त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत या मुकुटानं पेट घेतला होता. सुदैवानं इतर लोकांनी स्टेजवर धाव घेत आग आटोक्यात आणली. काही सेकंदाच उशीर झाला असता तरी ही मॉडेल आगीत होरपळून काहीतरी विपरित घडलं असतं पण, सुदैवानं ती थोडक्यात वाचली.