07 March 2021

News Flash

पाहुण्यांचा एकटेपणा घालवण्यासाठी हॉटेलची ‘गोल्डन’ ऑफर

जाहिरातीनं सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेतलं

या फोटोला १३ हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही हॉटेल मालक भन्नाट ऑफर जाहीर करतात. बेल्जिअममधील एका हॉटेलनं पर्यटकांसाठी जाहीर केलेल्या ऑफरची सध्या जोरदार चर्चा आहे. या हॉटेलनं येथे येणाऱ्या पाहुण्यांना चक्क मासे भाड्याने द्यायला सुरूवात केली आहे. ‘जर तुम्ही रुममध्ये एकटे असाल आणि तुम्हाला कोणाची सोबत हवी असेल तर तुम्ही गोल्ड फिश भाड्यानं घेऊ शकता’, अशी जाहिरात हॉटेलनं केली आहे. या अनोख्या जाहिरातीनं सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ब्रसेल्सच्या चार्लरोई एअरपोर्ट हॉटेलमध्ये ही भन्नाट ऑफर सुरू आहे. जवळपास २५० रुपये मोजून एका रात्रीसाठी ‘गोल्डफिश’चा बाऊल पाहुण्यांना भाड्यानं घेता येतो. एकटेपणा घालवण्यासाठी किंवा विरंगुळा म्हणून अनेक पाहुणे भाड्यानं बाऊल विकत घेत आहेत. या ऑफरला पाहुण्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. हॉटेलमध्ये येणारे अनेक पाहुणे मासे भाड्याने घेतात. अनेक वर्षांपासून अशा प्रकारची ऑफर पर्यटकांना दिली जाते, असे हॉटेल मालकाने ‘द इंडिपेडंट’ला सांगितले.

मायकल कूकी या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या फोटोला १३ हजारांहून अधिक यूजर्सनं रिट्विट केलं आहे. खरं तर अनेक जणांना ही भन्नाट ऑफर आवडली आहे. पण काही प्राणीप्रेमी संघटनांनी त्यावर टीका करायला सुरूवात केलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 1:30 pm

Web Title: belgian hotel has attracted attention for offering to rent lonely guests a fish
Next Stories
1 Teachers Day 2017: गुगलची डुडलद्वारे गुरूवंदना!
2 Teachers Day 2017 : ‘शिक्षक दिन’ जगभरात का साजरा केला जातो माहितीये का?
3 Teachers Day 2017 : …म्हणून ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो शिक्षक दिन
Just Now!
X