06 December 2019

News Flash

वजन घटवण्यासोबतच ग्रीन टीचे असेही काही फायदे

ग्रीन टी निराशा घालविण्यासाठी फायद्याचा...

ग्रीन टी घेतल्याने हे होते, ग्रीन टी घेतल्याने ते चांगले होते असे आपण अनेकदा ऐकतो. महिला तर एखाद्या मैत्रिणीला त्याचा उपयोग झाला म्हणून मोठ्या उत्साहाने लगेच खरेदीही करतात. मात्र सुरुवातीला जोमाने सुरु केलेला एखादा पण ग्रीन टी ४ दिवसातच डब्यात बंद होतो. कधी चव आवडली नाही म्हणून तर कधी विसर पडला म्हणून असे अनेक संकल्प सुरु होतात खरे. मात्र काही दिवसांतच या नव्याची नवलाई संपून जाते. पण काही गोष्टी ठरवून विशिष्ट कालावधीसाठी केल्यास त्या निश्चितच फायदेशीर ठरु शकतात. मात्र आरोग्याच्या बाबतीत कोणतीही गोष्ट नव्याने सुरु करताना त्याबाबत पुरेशी माहिती असलेली केव्हाही चांगली. तर ग्रीन टी घेण्यामुळे होणारे फायदे खालीलप्रमाणे…

निराशा घालविण्यासाठी फायद्याचा

थेनाईन हे अमिनो अॅसिड असते हे अॅसिड चहाच्या पानात असते. निराशा कमी करण्यासाठी म्हणजेच आनंदी राहण्यासाठी शरीराला या अॅसिडची आवश्यकता असल्याने ग्रीन टी घेतल्यास व्यक्तीचे निराशेचे प्रमाण कमी होते.

हृदयरोगासाठी उपयुक्त

रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत सुरु राहण्यासाठी तसेच त्या तंदुरुस्त राहण्यासाठी ग्रीनटी अतिशय उपयुक्त असतो. यामुळे रक्तदाबाचा त्रासही कमी होण्यास मदत होते. शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यास हृदयरोगाचा धोका असतो. मात्र ग्रीन टी घेतल्याने या गुठळ्या होत नाहीत आणि व्यक्तीचे हृदयरोगाच्या झटक्यापासून संरक्षण होते.

अल्झालमर आणि पार्किनसन्सवर उपयुक्त

ग्रीन टीमुळे मेंदूतील पेशी जास्त चांगल्या पद्धतीने काम करतात आणि या पेशी मृत होण्याचे प्रमाण कमी होते. तसेच खराब झालेल्या पेशींचा पुर्नसंचय करण्यास ग्रीन टी उपयुक्त ठरतो. त्यामुळे अल्झायमर आणि पार्किनसन्स होऊ नये म्हणून ग्रीन टी घेणे फायद्याचे ठरते.

त्वचारोगांसाठी फायदेशीर

वयोमानानुसार शरीरावर येणाऱ्या सुरकुत्या येतात. या सुरकुत्यांचे प्रमाण कमी राहावे यासाठी ग्रीन टी महत्त्वाचे काम करतो. ग्रीन टीमध्ये असणारे काही घटक यासाठी फायदेशीर ठरतात. उन्हामुळे शरीरावर येणारे डाग कमी करण्यासाठीही ग्रीन टीचा उपयोग होतो.

वजन कमी करण्यासाठी उपयोगी

शरीरातील चयापचय क्रीया सुरळीत करण्याचे काम ग्रीन टीव्दारे केले जाते. खाल्लेल्या अन्नाचे कॅलरीत रुपांतर होत असते. हे प्रमाण योग्य राखण्याचे काम ग्रीन टीच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे वाढलेली चरबी आणि वजन कमी होण्यास ग्रीन टी उपयुक्त ठरतो.

First Published on April 18, 2019 2:55 pm

Web Title: benefits of green tea 2
Just Now!
X