News Flash

रात्री झोपताना उशाखाली लसूण ठेवल्यावर असाही फरक पडतो

अनेक लोक झोपताना उशाखाली लसूण ठेवून झोपतात

लसूण उशीखाली ठेवल्याने चांगली झोप लागते.

भारतीय जेवणामधल्या महत्त्वाच्या जिन्नसांपैकी लसूण एक. लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. हा आता  काही लोक असेही आहेत ज्यांना लसणाचा उग्र वास अजिबात आवडत नाही, पण कितीही नाक मुरडले तरी लसणाशिवाय जेवणाला मज्जा नाही हेही तितकेच खरे. लसूण अन्नाचा स्वाद वाढवते पण याव्यतिरिक्तही लसणाचे अनेक उपयोग आहे. आयुर्वेदात देखील लसणीचे महत्त्व सांगितले आहे. कोलेस्टेरॉल , रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. तर कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. लसणीच्या गुणांबद्दल तुम्ही ऐकले किंवा वाचले असतील पण लसणाचा आखणी एक फायदा आहे ज्याबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल.

आजही अनेक लोक लसणाची किमान एक तरी पाकळी उशाशी घेऊन झोपतात. तुम्हाला थोडे विचित्र वाटेल पण हे खरे आहे. यामागे काही वैज्ञानिक कारणं आहे. लसणीच्या इतर गुणांपैकी आणखी एक गुण असा आहे की लसणात रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्या ठेवला जायचा. असे केल्याने हवेतील रोगजंतू नाहीसे व्हायचे.  लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते. लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.

लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे.  पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते.  हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यात असणारे पोटॅशियम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाची स्पंदनेही नियंत्रित ठेवण्यास या पोटॅशियमचा उपयोग होतो. लसणात असलेले ‘क’ जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व व जस्त यांचा रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यास उपयोग होतो. लसणात अ‍ॅलिसिन नावाचे औषधी तत्त्व असते. त्यामुळे बुरशीचा संसर्ग, जीवाणू, विषाणू संसर्ग बरे होण्यास मदत होते. तेव्हा या  बहुगुणी लसणाचा तुम्ही फक्त जेवणातच नाही तर अशा वेगळ्या प्रकारेही वापर करू शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 12:01 pm

Web Title: benefits of putting garlic under your pillow
Next Stories
1 VIDEO : भारताचा ‘मॅग्नेट मॅन’!
2 Viral Video : अन् मेट्रोत सुरू झाला डान्स धमाका
3 ४० किलो चॉकलेट वापरून साकारला गणपती बाप्पा, दुधात करणार विसर्जन
Just Now!
X