News Flash

दिवसात एक तरी डुलकी घ्याच

न झोपता आपण काम तर करु शकतो पण त्या कामात नाविण्य आणि परिपूर्णता नसेल

दिवसात एक तरी डुलकी घ्याच

काम करताना थकवा वाटत असेल तर समजावे की शरीराला आरामाची गरज आहे. तज्ज्ञांच्या मते, दिवसात थोडावेळ डुलकी काढली तर त्याचे फायदे अनेक आहेत. नक्की डुलकीचे फायदे तरी कोणते ते पाहुया..
अनेक लोकांना दिवसात दोनदा झोपेची गरज असते. न झोपता आपण काम तर करु शकतो पण त्या कामात नाविण्य आणि परिपूर्णता नसेल. संशोधनानुसार दिवसात एखादी डुलकी नंतर हृदयाचे ठोके हे पाच टक्क्यांनी कमी प्रमाणात पडू लागतात. ज्यामुळे ३० टक्क्यांनी लक्ष केंद्रीत करायची क्षमता वाढते.
सतर्क राहण्यास मदतः
जर आपण कामात सतर्क राहीलो तर कामात चुकाही कमी होतात. दिवसभरात थोडावेळ डुलकी घेतल्याने सतर्क राहायला मदत होते.
तीव्र संवेदना जागरुक होतातः
डुलकी घेतल्यानंतर आवाज अधिक चांगल्या प्रकारे ऐकू येतात आणि रंगही अधिक स्पष्ट दिसायला मदत होते. ऐकण्याची क्षमता तीन डेसिबलने वाढते.
प्रेम करण्याच्या क्षमतेत वाढः
शरीराला जर योग्य आराम मिळाला तर शरीरात रक्त प्रवाह ७ टक्क्यांनी वाढतो. यामुळे तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे संबंध सुधारायलाही मदत होते. कारण जर शरीर उत्साही आणि सकारात्मक असेल तर मनही उत्साही राहायला मदत होते.
वजनावर नियंत्रणः
शरीराला जेवढी जास्त झोप मिळेल तेवढं वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील चयापचय संतुलित राहण्यासाठी शरीराला आराम मिळणं आवश्यक आहे. संशोधनानुसार पोषक तत्व आणि जीवनसत्त्वांचे पचन शरीरामध्ये योग्य प्रकारे होते.
सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढतेः
ज्या व्यक्ती काही मिनिटांची डुलकी घेऊन आल्यात आणि ज्यांनी डुलकी घेतली नाही अशा लोकांना काही प्रश्न विचारले गेले. ज्या व्यक्ती डुलकी घेऊन आले त्यांची उत्तरं ही इतरांच्या मानाने जास्त सकारात्मक मिळाली. संशोधकांच्या मते, शरीराला योग्य आराम मिळाला तर मानसिक तणावही कमी होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2016 8:10 pm

Web Title: benefits of taking a nap
Next Stories
1 चमकतील शिंगे आणि टळतील दुर्घटना
2 ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगीरीवरून ‘या’ पत्रकाराने देखील उडवली भारताची खिल्ली
3 Viral Video : जेव्हा चेतन भगत ठुमका लावतो
Just Now!
X