News Flash

…म्हणून त्या डॉक्टरला भरावा लागला ९० हजार रुपयांचा दंड

मुलीवर आली जीव गमावण्याची वेळ

पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडीत रुग्णाच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश झाला असून कुठलेही वैद्यकीय कागदपत्र किंवा पदवी नसताना या भामट्या डॉक्टरने रुग्णालय थाटले होते.

डॉक्टर म्हणजे रुग्णासाठी अक्षरश: देवासमान असतो. कठिण प्रसंगी प्राण वाचविण्याचे काम डॉक्टर करत असल्याने रुग्णाचाही त्यांच्यावर देवाइतकाच विश्वास असतो. पण याच डॉक्टरकडून एखादी लहानशी जरी चूक झाली तरी ती रुग्णाच्या जीवावर बेतू शकते आणि प्रसंगी रुग्ण दगावण्याच्याही घटना घडतात. वैद्यकीय निष्काळजीपणाच्या घटना घडल्याने रुग्णाचे नातेवाईक चिडतात, कधी या रागाच्या भरात डॉक्टरांवर हल्लाही करतात. याबाबत दाखल होणाऱ्या तक्रारींचे प्रमाणही सध्या वाढले असल्याचे आपल्याला पहायला मिळते. अशीच एक घटना बंगळुरुमध्ये नुकतीच घडली असून निष्काळजीपणामुळे या डॉक्टरांना थोडाथोडका नाही तर तब्बल ९० हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे.

मेंदूशी निगडीत आजार असलेल्या एका लहान मुलीला सतत ताप येत होता आणि अॅलर्जीही होत होती. यावर उपचार घेत असलेल्या रुग्ण मुलीला डॉक्टरांनी त्याला काही औषधे लिहून दिली. आता डॉक्टरांनी औषधे लिहून दिली आहेत म्हटल्यावर रुग्णाने ती घेतलीही. मात्र या औषधांचे साईड इफेक्टस झाले आणि तिला जीव गमवावा लागला. डॉक्टरांनी दिलेले औषधाचे डोस हाय पॉवरचे असल्याने त्याचा आपल्या मुलीवर शारिरीक आणि मानसिक परिणाम झाला असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळेच आपल्याला आपल्या मुलीला गमवावे लागले असल्याचा वडिलांचा आरोप मान्य करत ग्राहक मंचानेही ही तक्रार दाखल करुन घेतली. याविषयी सखोल चौकशी केली असता रुग्णाला दिलेली औषधे त्या आजारावर योग्य नसल्याचा निकाल दिला.

या चुकीची शिक्षा म्हणून संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. रुग्णाला प्राण गमवावे लागल्यामुळे चुकीची औषधे दिल्याच्या कारणावरुन संबंधित डॉक्टरांना ९० हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. आपल्या मुलीवर योग्य ते उपचार व्हावेत यासाठी वडिलांनी जवळपास १ लाख रुपये खर्च केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 7:18 pm

Web Title: bengaluru doctor pay 90000 fine for prescribing wrong medicine negligence
Next Stories
1 हा मासा खाल्ल्यानं जीवही जाऊ शकतो, तरीही माशाला मोठी मागणी
2 भारतीय जेवणाची चव आवडली, ‘त्या’ ग्राहकासाठी फ्रान्समध्ये विमानानं पाठवलं जेवण
3 ‘या’ २२ वर्षीय मॉडेलची कमाई ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Just Now!
X