करोना विषाणूच्या (Coronavirus)वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात मुलांना ऑनलाइन शिक्षणाचे (Online Education) धडे दिले जात आहेत. पण काही विद्यार्थांकडे स्मार्टफोन अथावा मोबाइल नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अशाच अडचणीतील विद्यार्थांसाठी खाकीतला देवमाणूस धावून आला आहे. शांथप्पा जीदमनव्वर हा पोलीस आधिकारी प्रवासी मजुरांच्या मुलांना मोफत शिक्षणाचे धडे देतो. सोशल मीडियावर त्याचे फोटो तुफान व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी त्याला रिअल सिंगम म्हणत आहेत.

कर्नाटक (Karnataka) राज्यातील बंगळुरुच्या (Bengaluru) अन्नपूर्णेश्वरी नगराचे (Annapurneshwari Nagar) पोलीस उपनिरीक्षक शांथप्पा जीदमनव्वर (Shanthappa Jademmanavr) मजूरांच्या मुलांना शिकवण्याचं काम करत आहेत. ज्या मुलांकडे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी लॅपटॉप, मोबाइल किंवा स्मार्टफोन नाहीत. विद्यार्थ्यांना मोफत शिकवण्याचं काम करणाऱ्या शांथप्पा जीदमनव्वर यांची सोशल मीडियावर चर्चा असून नेटकरी कौतुक करत आहे.

शांथप्पा ड्यूटीवर जाण्याआधी मजूरांच्या मुलांना शिकवतात. शांथप्पा रस्त्याच्या बाजूला असेलेल्या जागेत बोर्ड लावतात अन् मुलांना मोफत शिकवतात. शांथप्पा यांच्यामते… आई-वडीलांप्रमाणे त्यांनी मजूर होऊ नये. न्यूज एजन्सी एएनआयने शांथप्पा यांच्या या समाजकार्याची फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकतो की, ते विद्यार्थांना कसे शिक्षण देतात.


एएनआयसोबत बोलताना शांथप्पा म्हणाले की, ‘प्रवासी मजूरांच्या मुलांनाही शिक्षण मिळालं पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. ते शाळेत जाऊ शकत नाहीत, किंवा ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नाहीत. ही त्यांची चूक नाही. आई-बाबा प्रमाणे त्यांनीही मजूरी करु नये. फक्त शिक्षण घ्यावं.

नेटकरी शांथप्पाच्या या सामजकार्याचं तोंडभरून कौतुक करत आहेत. काहीजण त्यांना रिअर सिंघम म्हणत आहेत.