22 November 2019

News Flash

Video : लसूण सोलण्याच्या या अनोख्या पद्धतीने नेटकऱ्यांना लावलंय वेड

लसूण सोलणं म्हणजे गृहिणींसाठी कंटाळवाणं काम असतं. हे कंटाळवाणं काम चुटकीसरशी करण्यासाठी अनोखी युक्ती या व्हिडिओत वापरण्यात आली आहे.

सोशल मीडियावर कधी काय ट्रेण्ड होईल याचा नेम नाही. एखादा सामान्य व्हिडिओ नेटकरी कधी डोक्यावर उचलून घेतील हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर लसूण सोलण्याचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. लसूण हा जेवणातील मुख्य घटक. अनेक पदार्थात लसूण लागतोच. मात्र नेहमीच्या वापरातील लसूण सोलणं म्हणजे गृहिणींसाठी कंटाळवाणं काम असतं. हे कंटाळवाणं काम चुटकीसरशी करण्याची अनोखी युक्ती या व्हिडिओत वापरण्यात आली आहे.

कटरसारख्या एका अणकुचीदार वस्तूने पटापट लसूण कसं सोलता येतं हे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. ही प्रक्रियासुद्धा तशी काही क्लिष्ट नाही. ती अणकुचीदार वस्तू लसणाच्या पाकळीत घुसवून हाताच्या साहाय्याने सालीपासून लसूण वेगळा करण्यात येत आहे. अत्यंत साधी सोपी पद्धत पाहून नेटकरी भारावले आहेत.

सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. अशा युक्त्या समजून घेण्यासाठी इंटरनेटचा योग्य वापर होतो अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली आहे. तर काहींनी इतक्या सहजतेने लसूण कसा सोलता येतो यावर आश्चर्य व्यक्त केला आहे. काहींनी तर यावर मीम्ससुद्धा शेअर केले आहेत.

 

First Published on June 18, 2019 1:12 pm

Web Title: best method of peeling garlic is blowing netizens minds ssv 92
Just Now!
X