28 September 2020

News Flash

वहिनी, पुढच्यावेळी चहलला ओपनिंगला पाठवं म्हणा, तुमचं ऐकेल तो !

विरुष्काच्या त्या व्हिडीओवर चहलची अतरंगी कमेंट

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वत्र गंभीर वातावरण आहे. भारतामध्ये बीसीसीआयने आयपीएलसह आपल्या सर्व स्पर्धा रद्द केल्या आहेत. भारतीय खेळाडू या काळात घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही आपल्या चाहत्यांना लॉकडाउन काळात घराबाहेर न पडता सर्व सरकारी यंत्रणांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. या दिवसांमध्ये विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असतात.

क्वारंटाइन झालेल्या अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर कोहलीची फिरकी घेणारा एक गमतीशीर व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात अनुष्का विराटला, कोहली…चौका मार ना चौका असं बोलताना दाखवली आहे.

या व्हिडीओवर टीम इंडीयाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आपल्या अतरंगी स्टाईलमध्ये खास कमेंट केली आहे. “वहिनी पुढच्यावेळी चहलला ओपनिंगला पाठव असं म्हणा ना पुढच्यावेळी, कदाचीत तुमचं ऐकेल तो…” चहलच्या या कमेंटला नेटकऱ्यांनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

देशातली करोनाची परिस्थिती पाहता बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत आयपीएलचा तेरावा हंगाम स्थगित केला आहे. अजुनही विविध शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडतच आहेत…अशा परिस्थितीत सरकार यावर नियंत्रण मिळवण्यात कधी यशस्वी ठरतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 1:58 pm

Web Title: bhabhi next time tell him chahal se opening karwa le yuzvendra chahal tells anushka sharma in instagram reply psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 Video: गावाजवळील पडक्या घरामध्ये चार बिबट्यांचा अधिवास असल्याची माहिती समोर आली अन्…
2 Video: …आणि हायवेवर गाड्या धावत असतानाच उतरले विमान
3 Video: रस्त्यावर पडले हजारो रुपये, कोणीच नाही लावला हात; पोलीस म्हणाले, ‘हे तर रामराज्यच जणू’
Just Now!
X