News Flash

बिहार: मल्याळम अभिनेत्रीचा फोटो पेपरात चिकटवून आला, पासही झाला पण…

बोर्डाने कडक कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

exam
१९ जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना या परिक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे(प्रातिनिधिक छायाचित्र)

बिहारमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. एका परिक्षार्थीने आपल्या जागी चक्क एका मल्याळम अभिनेत्रीचा फोटो लावला. आणि विशेष बाब म्हणजे तो या परिक्षेत पासही झाला आहे. ऋषिकेश कुमार नावाच्या एका विद्यार्थ्याने २०१९च्या माध्यमिक शिक्षक पात्रता परिक्षेचा फॉर्म भरताना या अभिनेत्रीचा फोटो लावला. तो पास झाला. मात्र त्याच्या गुणपत्रिकेवर याच अभिनेत्रीचा फोटो दिसत होता.
या प्रकरणात या विद्यार्थ्याने मुद्दाम अभिनेत्रीचा फोटो लावल्याचा आरोप करत त्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्याचा निकालही रद्द करण्यात आला आहे. जहानाबाद जिल्ह्यातला परीक्षार्थी ऋषिकेश कुमार याने परिक्षेचा फॉर्म भरत असताना आपल्या फोटोऐवजी मल्याळम अभिनेत्रीचा फोटो अपलोड केला.

Bihar Marklist

बिहार शैक्षणिक महामंडळाने सर्व परिक्षार्थ्यांना अर्जातल्या चुका सुधारण्याची संधी दिली होती. मात्र तरीही ऋषिकेशने कोणताही बदल केला नाही. त्यामुळे हा फोटो तसाच राहिला. त्यामुळे ऋषिकेशच्या  Admit Card वरही हाच फोटो छापून आला. याहून विशेष गोष्ट म्हणजे हा मुलगा याच Admit card वर परीक्षाही देऊन आला. बिहार बोर्डाने स्पष्टीकरण दिलं आहे की फोटोच्या समस्येमुळे कोणताही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र यांच्या आधारावरही परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता.

या परिक्षेत हा मुलगा पासही झाला, तरीही त्याने फोटो बदलला नाही. जेव्हा त्याची गुणपत्रिका व्हायरल होऊ लागली, तेव्हा बिहार बोर्ड अडचणीत आलं. त्यामुले बोर्डाने त्याला नोटीस पाठवली आणि त्याचा निकाल रद्द करण्यात आला. या प्रकरणात आपण कडक कारवाई करणार असल्याचं बिहार बोर्डाने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 5:11 pm

Web Title: bihar stet exam malyalam actress photo candidate viral result vsk 98
Next Stories
1 लसीकरणाचा Missed Call; सुई टोचली पण….
2 ‘मेड इन बांग्लादेश’ बिस्किटची भारतीय बाजारपेठेत जबरदस्त चर्चा
3 Tokyo Olympic : खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी भारताचं स्पेशल ऑलम्पिक अँथम!
Just Now!
X