News Flash

आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सवात लिट्टी चोखा करणार भारताचं नेतृत्त्व

विदेशी खव्वयांना भारतीय पदार्थ आवडतील?

लिट्टी चोखा

आपल्या इथे जसा वडापाव, मिसळ प्रसिद्ध तसं बिहारमध्ये ‘लिट्टी चोखा’ हा सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ. पण आता अमेरिकेत होणाऱ्या सगळ्यात मोठ्या ‘फूड फेस्टिव्हल’मध्ये लिट्टी चोखा भारताचं नेतृत्त्व करणार आहे. मनिला इथल्या फूड फेस्टिव्हलमध्ये जगभरातील १७ देश सहभागी होणार आहे. मनिला फूड फेस्टिव्हल प्रसिद्ध फूड फेस्टिव्हलपैकी एक. इथे जगभरातल्या नाना चवी आणि त्या त्या देशांतले लोकप्रिय खाद्यपदार्थ चाखण्यासाठी खव्वयांची मोठी गर्दी जमते. या मोठ्या खाद्यजत्रेत दोन भारतीयांना भारतीय ‘स्ट्रीट फूड’चं नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली आहे.

वाचा : माणूस म्हणून रतन टाटांना जाणून घ्यायचं असेल तर हा किस्सा जरूर वाचा

वेगवेगळ्या देशातील पदार्थाचे एकूण ३० स्टॉल इथे असणार आहे. त्यापैकी दोन स्टॉल हे भारतीयांना देण्यात आले आहे. पटनाचा रहिवाशी असलेला दिनेश कुमार, दिल्लीचे दालचंद आणि रेखा देवी असा दोघांचा गट भारताचे नेतृत्त्व करणार असल्याचं ‘हिंदुस्थान टाइम्स’ने म्हटलं आहे. दिनेश लिट्टी चोखा तर दालचंद आणि रेखा देवी आलू टिक्की बनवणार आहेत. अमेरिका, थायलँड, मेक्सिको असे अनेक देश यात सहभागी होणार आहेत. तेव्हा भारताला इथे काँटे की टक्कर असणार हे नक्की! तेव्हा परदेशी खव्वयांना आपला लिट्टी चोखा आवडेल की मेक्सिकन टाको हे पाहण्यासारखं ठरेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 7:31 pm

Web Title: bihars famous dish litti chokha represent india at manila international food fest
Next Stories
1 माणूस म्हणून रतन टाटांना जाणून घ्यायचं असेल तर हा किस्सा जरूर वाचा
2 Viral Video : अजगर मगरीची पाच तासांची झुंज!
3 मारहाण झालेल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी पत्नीचा फेसबुकवर लढा