News Flash

बिल गेट्स यांनी विकत घेतला ३२८ कोटींचा आलिशान बंगला, फोटो पाहून थक्क व्हाल

या बंगल्याच्या व्यवहार ठरला सर्वात महागड्या व्यवहारांपैकी एक

फोटो सौजन्य: Trendir

जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामधील सॅन डियागो शहरामधील उच्चभ्रू वस्तीमध्ये एक आलिशान बंगला विकत घेतला आहे. या बंगल्याची किंमत चक्क ४२ मिलीयन डॉलर म्हणजेच ३२८ कोटी रुपये इतकी आहे. यासंदर्भातील वृत्त न्यू यॉर्क पोस्टने दिलं आहे.

बिल आणि मेलिंडा यांनी घेतलेला हा बंगला अगदी समुद्रकिनाऱ्यावर आहे. या बंगल्याचे क्षेत्रफळ पाच हजार ८०० स्वेअरफूट इतके आहे. बंगल्याध्ये सहा मोठे मास्टर बेडरुम आहेत. बंगल्याच्या मागच्या बाजूस लगेच समुद्रकिनारा असून हे प्रायव्हेट बीचही गेट्स यांच्याच मालिकीचे होणार असल्याचे समजते. बंगल्यामध्ये मोठा स्वीमींग पूल, १० लोक मावतील एवढा मोठा जकुजी एरिया आणि इतरही अनेक सोयीसुविधा या बंगल्यामध्ये आहेत. या परिसरातील सर्वात महगाड्या व्यवहारांपैकी हा व्यवहार असल्याचे द वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटलं आहे.

फोटो सौजन्य: Trendir

याआधी अॅमेझॉन या जगातल्या अव्वल ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जेफ बेजोसने जानेवारी महिन्यात प्रेयसी लारा सांचेझसाठी व्हॅलेंटाइन्स गिफ्ट म्हणून चक्क एक हजार १७८ कोटींचा बंगला खरेदी केला. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती डेव्हिड जिफिन यांचा लॉस एंजलिसमधील अलिशान बंगला जेफ यांनी आपल्या प्रेयसीसाठी भेट म्हणून विकत घेतला. हा व्यवहार लॉस एंजलिसमधील सर्वात महागडा व्यवहार ठरला आहे. याआधी माध्यम सम्राट रूपर्ट मरडॉक यांचा मुलगा लॅचलॅन याने २०१९ साली शहरामधील चार्टवेल इस्टेट येथील ब्रेवली हिल्स नावाने ओळखला जाणारा बंगला एक हजार ७१ कोटींना विकत घेतला होता. जेफ यांनी विकत घेतलेला हा बंगला १३ हजार ६०० स्वेअर फूट परिसरामध्ये पसरलेला आहे. यामध्ये अनेक बाल्कनी, सुंदर आणि महागडे टेरेस, दोन गेस्ट हाऊस, नर्सरी, टेनिस कोर्ट, स्वीमिंग पूल, गोल्फ कोर्स, मोटर कोर्ट अशा अनेक सुविधा आहेत. जेफ यांची या घराशिवाय लॉस एंजलिसमध्ये इतर दोन घरे आहेत. या दोन्ही घरांची एकूण किंमत २५७ कोटी रुपये इतकी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 3:39 pm

Web Title: bill and melinda gates buy 43 million dollar oceanfront home near san diego scsg 91
Next Stories
1 करोनंतरचं जग… हॉटेल आणि रेस्तराँमध्ये दिसणार ‘हे’ मुख्य बदल
2 Aarogya Setu अ‍ॅपबाबत केंद्राने घेतला मोठा निर्णय
3 स्वस्त झाला Samsung चा ‘बजेट’ स्मार्टफोन, मिळेल ट्रिपल कॅमेऱ्यासह ‘जंबो’ बॅटरीही
Just Now!
X