सोशल मीडियावर रोज काही ना काहीतरी व्हायरल होत असतं. यामध्ये वाईट आणि चांगल्या अशा दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. सध्या युजर्सना भावनिक करणारा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत महिला हरणाच्या पाडसाला स्तनपान करताना दिसत आहे. हा फोटो पाहून अनेक युजर्स भावूक झाले असून कौतुक करत आहेत.

भारतीय वन सेवा अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा फोटो ट्विट केला आहे. या फोटो जोधपूरमधील असून महिला बिश्नोई समाजातील आहेत. फोटोत महिला पाडसाला आपल्या बाळाप्रमाणे हातात घेऊन स्तनपान करताना दिसत आहे. हा फोटो तसा जुना आहे पण पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. बिश्नोई समाज हा प्राण्यांना देव मानतो.

हा फोटो ट्विट करताना त्यांनी लिहिलं आहे की, “जोधपूरमध्ये बिश्नोई समाज अशा पद्दतीने प्राण्यांची काळजी घेतो. हे सुंदर प्राणी त्यांना त्यांच्या मुलांप्रमाणे आहेत”.

हा फोटो युजर्सना प्रचंड आवडला असून हजाराहून जास्त जणांनी लाईक केला आहे तर चार हजारांहून जास्त जणांनी शेअर केला आहे. अनेकांनी या फोटोवर कौतुक केलं असून ही महिला एक महान आई असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.