विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नागपूरमधील मेडिकलच्या विविध विभागांना भेट देत सोयींची पाहणी केली. नागपूरमधील अधिष्ठाता कार्यालयातून त्यांनी व्हिडीओ  कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रामा केअरमध्ये उभारलेल्या कोविड रुग्णालयातील दोन रुग्णांशी संवाद साधून त्यांची चौकशी केली. फडणवीस गुरुवारी दीड वाजता मेडिकलला पोहचले व अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेतली. फडणवीस यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर फडणवीस यांनीच कमेंट करुन ‘सुपर’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावरुनच आता नेटकऱ्यांनी फडणवीस यांना ट्रोल केल्याचं दिसत आहे.

अवघ्या आठ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये फडणवीस अत्याधुनिक बेड्सची सुविधा करण्यात आलेल्या वॉर्डमध्ये तोंडला मास्क लावून प्रवेश करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर फडणवीस यांच्याच व्हेरिफाइड अकाऊंटवर टाळ्या वाजवणाऱ्या इमोन्जीच्या मदतीने ‘Super’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
Former MLA Narayanarao Gavankar withdraws from Akola Lok Sabha constituency
माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांची माघार, अकोला भाजपमधील बंड…
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत


मात्र फडणवीस यांनीच व्हिडिओ पोस्ट करुन त्यांनीच प्रतिक्रिया दिल्याने अनेकांनी त्यांच्या या प्रतिक्रियेवर मजेदार कमेंट दिल्या. तुम्हीच काय कमेंट करताय असा प्रश्न काहींनी विचारला तर काहींनी ‘आत्मनिर्भर’ इतकीच कमेंट या प्रतिक्रियेला रिप्लाय देताना केली होती. ‘सर तुम्हीत धन्यवाद इमोन्जी टाकता हे जनतेने टाकले पाहिजेत’, ‘सर तुम्हीच कमेंट करायला लागले’, ‘यालाच म्हणतात स्वत:ची पाठ स्वत:च थोपटणे’, ‘स्वत:च्या पोस्टला तुम्ही स्वत: सुपर म्हणताय’ अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी या प्रतिक्रियेवर दिल्या. तुम्हीच पाहा काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे.

याच पोस्टवर नाही तर फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्र भाजपाने पोस्ट केलेला अन्य एक व्हिडिओ शेअर करत त्यावर कमेंट दिली होती. “विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील काही रुग्णांसोबत व्हिडिओ काॅलवर संवाद साधत असताना,” या कॅप्शनसहीत महाराष्ट्र भाजपाने शेअर केलेल्या व्हिडिओवर फडणवीस यांनी ‘Sup?’ अशी कमेंट केली होती.

फडणवीस यांच्या अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या कमेंट सध्या या व्हिडिओ दिसत नसल्या तरी या खरोखरच फडणवीस यांनीच केल्या की चुकून झाल्या होत्या यासंदर्भात कोणताही माहिती कळू शकलेली नाही. मात्र नेटकऱ्यांनी या कमेंटवरुन फडणवीस यांना ट्रोल केल्याचे दिसून आलं. फडणवीस यांना ट्रोल करणाऱ्यांविरोधात भाजपाच्या नेत्यांनी आधीच मुंबई आणि नागपूरमध्ये पोलिसांकडे धाव घेतली आहे. मात्र त्यानंतरही अनेकजण त्यांच्या फेसबुक पोस्टवर कमेंट करुन त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत.