News Flash

‘गळती’ से मिस्टेक… प्रसाद लाड यांचे हिंदी पाहून नेटकरी म्हणाले, ‘हिंदीसाठी ही पावती फाडायला हवी होती’

भाजपाचे प्रसाद लाड त्यांच्या एका ट्विटमुळे होत आहेत ट्रोल

(फोटो सौजन्य : twitter/PrasadLadInd वरुन साभार)

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (१३ ऑक्टोबर २०२० रोजो) राज्यभरातील मंदिरे खुली करण्यात यावीत यासाठी आंदोलनं केली. मुंबईमध्येही सिद्धीविनायक मंदिरासमोर भाजपाच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते प्रसाद लाड या नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.काहीही झालं तरी आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करणार अशी भूमिका घेणाऱ्या भाजपाच्या काही नेत्यांना कार्यकर्त्यांसहीत पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र या सर्व प्रकरणामध्ये तोंडावरील मास्क निघाल्याचे प्रसाद लाड यांना एका पत्रकाराने लक्षात आणून दिलं. त्यानंतर लाड यांनी महानगरपालिकेमध्ये जाऊन मास्क न घातल्याबद्दल दंड भरल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. मात्र ही माहिती देताना त्यांनी कॅप्शनसाठी वापरलेल्या हिंदीवरुन त्यांना सध्या ट्रोल केलं जातं आहे.

प्रसाद लाड यांनी मास्क न घातल्याबद्दल २०० रुपये दंड भरल्याच्या पावतीचा फोटो ट्विट करुन घडलेल्या प्रकाराबद्दलची माहिती दिली आहे. मात्र या फोटोला कॅप्शन देताना हिंदीतील काही शब्द चुकीचे टाइप झाले आहेत. “गलती को माफी नहीं, हम कोई भी हो न्याय व्यवस्था सबसे बडी है… आंदोलन मे पोलीस कि दडपशाही कारण मेरा मुह: का मास्क निच्ये आया मुझे ये बात झी न्यूज ने नजर में लाई मैने मेरी गळती कि माफी मांगते हुवे खुद्द महानगर पालिका कार्यालय जाके खुद जुर्माना भर दिया..”, अशी कॅप्शन लाड यांनी या फोटोला दिला आहे.

लाड यांनी दिलेल्या कॅप्शनमध्ये मास्क निचे ऐवजी ‘निच्ये’ आणि गलती ऐवजी ‘गळती’ अशा शब्द टाइप झाला आहे. यावरुनच आता त्यांना हिंदी भाषेच्या वापरासाठी ट्रोल केलं जात आहे. लाड यांच्या ट्विटवर अनेकांनी त्यांनी वापरलेल्या हिंदीसंदर्भात प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पाहुयात नक्की काय म्हटलं आहे युझर्सने…

१) रोज एक हिंदीत ट्विट करा

२) जबरदस्ती कोणी केलीय?

३) माणसाकडून झाली गळती

४) भाषेलाच गळती लागली

५) आमची करमणूक

६) झेपत नाय तर…

७) एक गळती की ताकद

८) पोलिस की दडपशाही

९) मराठी भय्या जीव देतील

१०) कारवाई होणार का?

११) हिंदीची चिंधी

१२) लिकेज शोधून गळती बंद केली पाहिजे

१३) अरुण गवळी पण…

१४) गळती झाली त्यांची

१५) मिम

१६) गळती को सुधारणा चाहिये वारणा पाणी बेहे जाता है…

१७) मनोरंजनात कसलीच कमी नाही

१८) ऐसे कैसे गळती होणे देता तुम?

१९) हे लाड साहेब तर…

२०)  गडकरी बरोबर बोलले होते…

एकंदरितच या ट्विटवरुन नेटकऱ्यांनी लाड यांची चांगलीच खिल्ली उडवल्याचे दिसत आहे. एकूण रिट्विटपैकी अनेक कोटेड ट्विट हे या हिंदीबद्दलच आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 7:45 pm

Web Title: bjp leader prasad lad troll for his bad hindi scsg 91
Next Stories
1 ‘भाजपाला कोणाच्याही जीवाची किंमत नाही’; काँग्रेसचा #NoLivesMatterToBJP मधून हल्लाबोल
2 Viral Video: नुडल्स बनवण्याची गंगनम स्टाईल; तरुणीची अनोखी पद्धत पाहून नेटकरी आवाक्
3 तनिष्कच्या ‘त्या’ जाहिरातीला लव्ह जिहाद म्हणणं मूर्खपणाचं-भरत दाभोळकर
Just Now!
X