24 January 2019

News Flash

फेकन्युज : भाजपमंत्र्यांच्या ‘डुलकी’चा ‘ट्वीट जागर’

या संदर्भातील एक ध्वनिचित्रफीतही ‘व्हायरल’ झाली होती.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत अर्थसंकल्प सादर करताना भाजपच्या दोन मंत्र्यांना डुलकी लागल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. यावर सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना देशाच्या आर्थिक विकासाबद्दल काही पडलेले नसल्याची धारदार टीका ‘ट्विटर’वर सुरू झाली. चित्रपट निर्माते राकेश शर्मा यांनी अर्थसंकल्प मांडताना मंत्र्यांच्या निद्रेविषयीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर ‘शेअर’ केले होते. या संदर्भातील एक ध्वनिचित्रफीतही ‘व्हायरल’ झाली होती.

मात्र या ध्वनिचित्रीफितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हर्षवर्धन जेटली यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकण्यासाठी डोळे मिटून घेतल्याचे स्पष्ट झाले, मात्र दोन्ही मंत्री झोपलेले नव्हते. त्यामुळे राकेश यांना स्वत:चे म्हणणे ट्विटरवर मागे घ्यावे लागले आणि सर्वाची माफीही मागावी लागली.

First Published on February 10, 2018 12:31 am

Web Title: bjp ministers sleeping in budget session 2018 fake news