News Flash

अन् आमदाराने मंत्रीपदाऐवजी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

कर्नाटकात मागील काही दिवसांपूर्वी घडलेल्या राजकीय नाट्यानंतर कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले व येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

कर्नाटकात मागील काही दिवसांपूर्वी घडलेल्या राजकीय नाट्यानंतर कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले व येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांनी २६ जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली होती. तर २९ जुलै रोजी विधानसभेत सरकारचे बहुमत सिद्ध केले होते. यानंतर मंगळवारी येडियुरप्पा यांनी मंत्रिमडळाचा पहिला विस्तार केला. ज्यामध्ये १७ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीमंडळाच्या विस्तारावेळी एका आमदाराने मंत्रीपदाऐवजी चुकून चक्क मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा सर्व प्रकार पाहून मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्मिथ हास्य केले.

आमदार मधू स्वामी मंगळवारी मंत्रीपदाची शपथ घेत होते. त्यावेळी चुकून त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. वेळीच त्यांना चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी स्मिथ हास्य करत आपली चूक दुरूस्त केली. या प्रकारावेळी मुख्यमंत्री येडियुरप्पा उपस्थित होते. येडियुरप्पा यांनी स्मिथ हास्य करत मधू स्वामी यांची गळाभेट घेतली.

मंगळवारी राज्यपाल वजूभाई वाला यांनी राजभवनात १७ नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात आलेल्यांमध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्यासह के.एस.ईश्वरप्पा व आर.अशोक हे दोन माजी उपमुख्यमंत्री, अपक्ष आमदार एच.नागेश आणि लक्ष्मण सावदी, श्रीनिवास पुजारी यांचा समावेश आहे. यांच्याशिवाय गोविंद एम. करजोल, अश्वथ नारायण सी. एन, बी. श्रीरामुलु, एस. सुरेश कुमार, वी. सोमन्ना, सी. टी. रवि, बासवराज बोम्मई, जे. सी. मधु स्वामी, सी. सी. पाटील, प्रभु चौहान आणि शशिकला जोले अण्णासाहेब यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 1:18 pm

Web Title: bjp mla madhu swamy gaffe takes oath as chief minister nck 90
Next Stories
1 अखेर WhatsApp आणि Instagram चं झालं नामकरण, ‘या’ कारणामुळे केला नावात बदल
2 Viral Video : तारेच्या कुंपणावर चढणारी मगर बघून लोक झाले अवाक्
3 पाकिस्तानी मंत्र्याचा खोटारडेपणा उघड, काश्मीरच्या नावाने शेअर केला भलताच व्हिडिओ
Just Now!
X