बीएमडब्ल्यूने शतकपूर्तीनिमित्त नवी बाईक आणली आहे विशेष म्हणजे ही बाईक कितीही वेगात चालवली तरी या बाईकचा अपघात होणार नाही असा दावा या कंपनीने केला आहे. या बाईकला ‘नेक्स्ट १००’ असे नाव कंपनीने दिले आहे.
बीएमडब्लू ही कंपनी लवकरच १०० व्या वर्षांत पर्दापण करणार आहे त्यानिमित्ताने अद्यावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी बाईक बीएमडब्ल्यूने आणली आहे. या बाईकची उंची ही चालक त्याच्या उंचीप्रमाणे कमी जास्त करु शकतो. विशेष म्हणजे ही बाईक अतिवेगात जरी चालवली तरी तिचा अपघात होऊ शकत नाही असा दावा कंपनीचा आहे. या बाईकमध्ये ‘एक्टिव असिस्टेंट सिस्टम’ असल्यामुळे ही बाईक संतुलन राखण्यास मदत करणार आहे. ही बाईक चालवण्यासाठी हेल्मेटची देखील आवश्यकता चालकाला भासणार नसल्याचे कंपनीने सांगितले. या बाईकवर बसताना मात्र चालकाला या बाईकसोबत देण्यात येणारा चष्मा घालणे आवश्यक असणार आहे. तसेच जेव्हा चालक या बाईकवर बसणार तेव्हाच या बाईकचे हँडल बाहेर येतील. या बाईकचा व्हिडिओ बीएमडब्ल्यूने इंटरनेटवर अपलोड केला आहे. अगदी अल्पावधीतच जगभरातील बाईक प्रेमींना या बाईकने भुरळ पाडली आहे.