लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Amazon Prime Video च्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. ‘तांडव’ वेबसीरिजवरुन झालेल्या वादानंतर आता अजून एक वाद समोर आलाय. मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री साक्षी मलिक हिने केलेल्या तक्रारीनंतर Amazon Prime Video ला फटकारलंय. साक्षी मलिकच्या तक्रारीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने तेलगू सिनेमा ‘वी’ (V) ला OTT प्लॅटफॉर्मवरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत. सिनेमामध्ये फोटोचा गैरवापर करण्यात आल्याचा दावा करत साक्षी मलिकने कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. सिनेमात परवानगी न घेता फोटोचा वापर केला गेला, तसेच ‘सेक्स वर्कर’ असल्याचं फोटोतून दाखवण्यात आलं असा दावा करत साक्षीने कोर्टात धाव घेतली होती.

एखाद्याची परवानगी नसताना त्याचा खासगी फोटो वापरणं अयोग्य आणि पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने नमूद केलं. तसेच या खटल्यात हा प्रकार बदनामीकारकही ठरू शकतो, असंही कोर्टाने म्हटलं. कोर्टात साक्षीच्या बाजूने वकील सवीना बेदी यांनी बाजू मांडली. ‘अभिनेत्री लोकप्रिय असून सोशल मीडियावर अनेकजण तिला फॉलो करतात, ती अनेक बॉलिवूड सिनेमांमध्येही झळकली आहे. त्यामुळे तिची प्रतिमा मलिन होत आहे’, असं बेदी यांनी कोर्टात म्हटलं. त्यावर न्यायाधीश पटेल यांनी अभिनेत्रीचा फोटो वापरलेलं दृष्य जोपर्यंत डिलीट होत नाही तोपर्यंत २४ तासांच्या आत तेलगू सिनेमा ‘वी’ (V) ला OTT प्लॅटफॉर्मवरुन हटवण्याचे आदेश दिले.

bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

ऑगस्ट २०१७ मध्ये साक्षीने एक पोर्टफोलिओ शूटिंग केले होते, ते फोटो तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले होते. त्यातील एक फोटो V सिनेमातील एका दृष्यात सेक्स वर्कर म्हणून दाखवण्यात आला. ५ सप्टेंबर २०२० रोजी हा सिनेमा अ‍ॅमेझॉनवर प्रदर्शित झाला होता. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मार्च रोजी होईल.