16 January 2021

News Flash

लांबलेल्या ‘पद्मावत’ वादावर क्रिएटीव्ह टोमणा; ‘ही’ जाहिरात झाली व्हायरल

ओळीतील प्रत्येक शब्दाचे शेवटचे अक्षर पाडते

जाहिरात झाली व्हायरल

सेन्सॉर बोर्डाच्या सहा सदस्यांच्या समितीने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी पद्मावती सिनेमाचे नाव बदलून पद्मावत केले. ३० डिसेंबर रोजी सेन्सॉर बोर्डने हा निर्णय घेतल्यानंतर जवळ जवळ एक महिन्याने हा सिनेमा प्रदर्शित झाला तरी त्यावरील वाद काही थांबला नाही. मागील तीन महिन्यापासून पद्मावत सिनेमाबद्दल सुरु असणारा वाद लांबत लांबत आज सिनेमा प्रदर्शित झाला तरी सुरुच आहे. शेवटचे अक्षर काढणे आणि लांबत चाललेला वाद या दोन मुद्द्यांना धरूनच ‘बुक माय शो’ या ऑनलाइन तिकीट वेबसाईटने अनोखी जाहिरात केली आहे. सध्या ही जाहिरात सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

३२ सेकंदाचा हा व्हिडीओ पद्मावती नावाच्या स्पेलिंगमधून आय अक्षरावरील डॉट खाली पडण्यापासून सुरु होतो. हा डॉट खाली जाताना खालील ओळीतील प्रत्येक शब्दाचे शेवटचे अक्षर पाडत जाते. व्हिडिओ जसा जसा पुढे जातो त्याप्रमाणे त्यामध्ये सिनेमात कोणते कलाकार आहेत, कधी सिनेमा प्रदर्शित होत आहे यासारखी माहिती देण्यात आली आहे. व्हॉइस ओव्हरमध्येही वाक्यातील शेवटचे अक्षर वगळूनच शब्दांचा उच्चार करण्यात आला आहे. एकंदरीतच कंपनीने तयार केलेली ही जाहिरात आमच्या वेबसाईटवरून तिकीट बूक करा अशा आशयाची असली तरी त्याला देण्यात आलेल्या मजेदार ट्विस्टमुळे ती सोशल नेटवर्किंगवर चांगलीच व्हायरल होत आहे. पद्मावतच्या विरोधकांवर क्रिएटीव्ह पद्धतीने काढलेला हा चिमटा सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

कालपासूनच देशामध्ये पद्मावतच्या प्रदर्शनाविरोधात करणी सेनेचे आंदोलन सुरु आहे. विशेष करून उत्तर भारतामध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून गुजरात, हरियाणा, राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ करण्यापासून ते वाहनांची तोडफोड करण्यापर्यंत अनेक प्रकारे विरोध दर्शवला आहे. मात्र नेटकऱ्यांनी करणी सेनेचा अकारण होणारा हा विरोध पचनी पडत नसल्याने त्यांनी आंदोलकांनाचा शाब्दिक चिमटे काढण्यास आणि टोमणे मारण्यास सुरुवात केली आहे.

पाहा ही जाहिरात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2018 11:02 am

Web Title: bookmyshow has released their latest social media campaign taking a dig at the never ending controversy around the movie padmaavat
Next Stories
1 जाणून घ्या इंग्रजी साहित्यिका व्हर्जिनिया वूल्फ यांच्याविषयी
2 चेतेश्वर पुजाराची ट्विपल्सनी ‘अशी’ उडवली खिल्ली
3 प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्विटरने लाँच केला ‘हा’ अनोखा इमोजी
Just Now!
X