News Flash

खोदकाम करताना सापडला जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा; हिऱ्याचा आकार पाहून थक्क व्हाल

या हिऱ्यामुळे आफ्रिकेतील देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागण्याची चिन्हं आहेत. हा हिरा विकला जाण्याची शक्यता असून त्यापैकी ८० टक्के रक्कम सरकारला मिळेल

हा हिरा १ हजार ९८ कॅरेटचा असल्याची माहिती हिरे शोधणाऱ्या देबस्वाना कंपनीने दिलीय. (फोटो सौजन्य: रॉयटर्सवरुन साभार)

पूर्व आफ्रिकेमधील बोत्सवाना देशामध्ये जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी एक हिरा सापडला आहे. हा हिरा एका ठिकाणी खोदकाम सुरु असताना सापडला असून तो जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा ठरलाय. हिरे शोधणाऱ्या देबस्वाना कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा हिरा १ हजार ९८ कॅरेटचा आहे.

नक्की पाहा >> Top 10 : या दहा देशांकडे आहे सर्वाधिक सोनं, पहिल्या स्थानावर आहे…

देबस्वानाचे प्रबंध निर्देशक लयनेट आर्मस्ट्रँग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणवत्तेच्या आधारे हा जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा आहे. हा दुर्मिळ आणि खूप खास असणारा हिरा देशातील हिऱ्यांशी संबंधित उद्योग आणि बोत्सवानासाठी फार महत्वाचा असल्याचंही आर्मस्ट्रँग यांनी म्हटलं आहे. हा नवीन हिरा सध्या करोना परिस्थितीमुळे फार संघर्ष करत असणाऱ्या आमच्या देशाला नवीन ऊर्जा देईल अशी अपेक्षा आर्मस्ट्रँग यांनी व्यक्त केली आहे. या हिऱ्याला अद्याप नाव देण्यात आलेलं नसल्याचं रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> मध्य प्रदेश : लॉकडाउनदरम्यान खाणीत काम करताना सापडला हिरा, किंमत पाहून व्हाल थक्क

देबस्वाना कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा हिरा ७३ मिलीमीटर लांब आणि ५२ मिलीमीटर रुंद आहे. आमच्या कंपनीच्या इतिहासातील हे आतापर्यंतचं सर्वात मोठं यश आहे असंही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. देबस्वाना कंपनीची स्थापना बोत्सवाना सरकार आणि हिऱ्यांसाठी ओळखली जाणारी जागतील आघाडीची कंपनी असणाऱ्या डी बीयर्सने एकत्र येऊन स्थापन केलं आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये १०९५ साली जागतील सर्वात मोठा हिरा सापडला होता. हा हिरा ३ हजार १०६ कॅरेटचा होता. जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा हा टेनिस बॉलच्या आकाराचा आहे. हा हिरा सुद्धा २०१५ मध्यो बोत्सवानामध्येच सापडला होता.

नक्की वाचा >> याला म्हणतात नशीब… ‘या’ अनमोल गोष्टींमुळे रातोरात झाला २५ कोटींचा मालक

जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा हा ११०९ कॅरेटचा होता. त्याला लेसेडी ला रोना असं नाव देण्यात आलेलं. हिरे निर्मिती क्षेत्रात बोत्सवाना हा आफ्रीकेमधील आघाडीचा देश आहे. करोनाच्या आर्थिक संकटाच्या काळामध्ये एवढा महागडा आणि मैल्यवान हिरा मिळाल्याने बोत्सवाना सरकारला मोठा दिलासा मिळालाय. देबस्वाना कंपनी हा हिरा विकण्याचा विचार करु शकते. या हिऱ्याची विक्री झाल्यास त्यापैकी ८० टक्के रक्कम ही सरकारच्या तिजोरीमध्ये जाईल. करोना कालावधीमध्ये हिऱ्यांची मागणी कमी झाल्याने बोत्सवाना आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे या हिऱ्याला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 3:54 pm

Web Title: botswana diamond news african country unearths worlds third largest diamond scsg 91
Next Stories
1 २ लाख ७० हजार रुपये किलो… हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा
2 गुजरातमध्ये दोन महिन्याच्या बाळाला 24*7 पोलीस सुरक्षा; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
3 हे आहे ‘जगातील सर्वात शक्तीशाली चुंबक’; विमानवाहू युद्धनौकेलाही सहा फुटांपर्यंत उचलण्याची ताकद
Just Now!
X