20 November 2019

News Flash

Video: प्रो कब्बडीमधील खेळाडूंचा #BottleCapChallenge वर ‘ले पंगा’

बॉटल कॅप चॅलेंजच्या आखाड्यामध्ये प्रो कब्बडीच्या सातव्या पर्वात दिसणाऱ्या खेळाडूंनीही उडी घेतली आहे.

जगभरामध्ये सध्या चर्चा आहे ती बॉटल कॅप चॅलेंजची. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटीजपर्यंत अनेकजण बाटलीवरील झाकण बाटली हलू किंवा पडू न देता काढणारे हे चॅलेंज स्वीकारताना दिसत आहेत. आता या चॅलेंजच्या आखाड्यामध्ये प्रो कब्बडीच्या सातव्या पर्वात दिसणाऱ्या खेळाडूंनीही उडी घेतली आहे.

मागील पर्वाचा विजेता ठरलेल्या बंगळुरु बुल्सचा कर्णधार रोहित कुमार याने सर्वात आधी हे चॅलेंज स्वीकारले आहे. बॉलिवूडमधील खिलाडी अभिनेता अक्षय कुमार यानेही हे चॅलेंज पूर्ण करत त्याचा व्हिडओ सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केल्यानंतर रोहितने त्याच्याकडून प्रेरणा घेत हे चॅलेंज पू्र्ण केलं. रोहितने आता भारताचे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना चॅलेंज केलं आहे. रोहितबरोबरच युपी योद्धाचा स्टार रायडर रिशांक देवाडिगा, यू मुम्बाचा फझल अत्राचाली यांनी बॉटल कॅप चॅलेंज स्वीकारत ते पूर्ण केले. या सर्वांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

रोहित कुमार

फझल अत्राचाली

View this post on Instagram

#BottleCapChallenge. . . @u_mumba #high5 #lepanga #howsthejosh

A post shared by fazel atrachali (@fazelatrachali_kabaddi) on

रिशांक देवाडिगा  

दरम्यान, २० जुलैपासून प्रो कब्बडी लीगचे सातवे पर्व सुरु होत असून यंदाच्या वर्षीही ही स्पर्धा तीन महिने चालणार आहे. या स्पर्धेचा शेवटचा सामना १९ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

First Published on July 9, 2019 3:02 pm

Web Title: bottle cap challenge takes over the kabaddi universe scsg 91
Just Now!
X