News Flash

VIDEO : …आणि त्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आली ७० पोलीस अधिकाऱ्यांची कुमक

वडिलांच्या निधनानंतर तो शाळेत गेलाच नाही. कर्तव्य बजावत असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. बऱ्याच दिवसांनी तो शाळेत जात होता.

डकोटाचा वडिलांच्या निधनानंतर शाळेतला तो पहिलाच दिवस होता.

पाच वर्षांचा डकोटा पिट्स, शाळेत जायला तयार नव्हता. काही दिवसांपूर्वीच पोलीस दलात काम करणाऱ्या त्याच्या वडिलांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. साहजिकच याचं दु:ख डकोटाला होतं. वडिलांच्या निधनानंतर तो शाळेत गेलाच नाही. अखेर या दु:खातून बाहेर आल्यानंतर बऱ्याच दिवसानं तो शाळेत जायला निघाला वडील सोबत नसले तरी त्यांच्या एखाद्या मित्रानं आपल्याला शाळेत सोडावं ही डकोटाची इच्छा होती. वडिलांसोबत काम करणाऱ्या त्यांच्या एका मित्राला डकोटाच्या आईनं त्याची इच्छा बोलून दाखवली आणि काय आश्चर्य दुसऱ्या दिवशी इंडियाना पोलीस विभागातून एक दोघं नाही तर जवळपास ७० पोलीस त्याला शाळेत सोडायला आले होते.

डकोटाचा वडिलांच्या निधनानंतर शाळेतला तो पहिलाच दिवस होता. वडील नसल्यानं एकटं वाटू नये यासाठी त्याच्या वडिलांसोबत काम करणारे पोलीस विभागातलेच अनेक पोलीस डकोटाच्या घरी आले होते. डकोटा जेव्हा शाळेत जायला निघाला त्यावेळी त्याच्या घराबाहेर पोलीस दलातील ७० कर्मचारी उभे होते. त्यानं लहान वयात आपल्या वडिलांना गामावलं आहे. याचं दु:ख आम्ही जाणतो. त्याला वडिलांची कधीही कमी भासू नये यासाठी आम्ही सगळेच त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणूनच आम्ही त्याच्या घरी आलो अशी प्रतिक्रिया एका पोलीस अधिकाऱ्यानं सीएनएनशी बोलताना दिली.

कर्तव्य बजावत असताना पोलिसांचा किंवा जवानाचा मृत्यू झाला की अनेकदा त्यांच्या कुटुंबाच्या वाट्याला उपेक्षाच येते काही दिवसांनी जगालाही त्यांच्या कुटुंबाबद्दल विसर पडतो पण, या पोलिसांनी मात्र एक वेगळंच उदाहरण जगापुढे ठेवून माणूसकी अजूनही जिवंत आहे याचा दाखला दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 11:35 am

Web Title: boy returns to school after dad death 70 cops escort him
Next Stories
1 Jumbo ‘royal’ cake: ब्रिटनच्या राजघराण्यातील लग्नाच्या निमित्ताने तिने बनवला ‘रॉयल’ केक
2 फेकन्युज : सारेच ‘फेकू’जन!
3 फेकन्युज : अधिक पिकलेले केळे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचा दावा खोटा
Just Now!
X