News Flash

Viral Video : या मुलाला एक काय दहा सुट्ट्या द्या! असा रजेचा अर्ज तुम्ही पाहिला नसेल

व्हिडिओ एकदा पाहाच!

हा मुलगा आपल्या रजेचा अर्ज शिक्षकांना चक्क गाऊन दाखवत होता

शाळेला सुट्टी मिळावी, म्हणून आपण किती कारणं पुढे केली असतील. कधी डोक दु:खतंय कधी आई आजारी आहे तर कधी आणखी काही. थोडक्यात काय तर आपल्यापैकी अनेकांनी सुट्टी मिळवण्यासाठी शाळेत अशा असंख्य थापा कधी ना कधी मारल्या असतील. खोट्या चिठ्ठ्या लिहून त्या शाळेतल्या शिक्षकांपुढे नेल्या असतील. पण, पाकिस्तानमधल्या एका विद्यार्थ्यानं सुट्टी मिळावी म्हणून शिक्षकांपुढे असा काही सुट्टीचा अर्ज सादर केला आहे की जो तुम्ही ऐकलात तर डोक्यावर हात माराल.

वाचा : २२ वर्षांपासून वाळूच्या किल्ल्यात राहणाऱ्या ‘राजा’ला पाहिलात का?

वाचा : ‘ते’ ट्विट भोवलं, L’Oreal च्या जाहिरातीतून मुस्लिम मॉडेलची माघार

पाकिस्तानी गायक शेहझाद रॉय यानं हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात हा मुलगा आपल्या रजेचा अर्ज शिक्षकांना चक्क गाऊन दाखवत होता. सुट्टीचं कारण तर या मुलानं गाऊन दाखवलंच पण, आश्चर्य म्हणजे या अर्जात पूर्णविराम, स्वल्पविराम, परिच्छेद कुठे कुठे आहे हेही त्यानं सांगितलं. त्यामुळे हा भन्नाट रजेचा अर्ज व्हायरल झाला नसेल तर नवल. हा रजेचा अर्ज त्याचे शिक्षकच काय पण इतर कोणीही ऐकला तरी या मुलाला एक काय दहा सुट्ट्या द्या असं बोलल्याशिवाय राहणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 6:41 pm

Web Title: boy sung his entire leave application to the headmaster and the video has gone viral on social media
Next Stories
1 Viral : १५०० कामगार आणि ९ तासांत बांधला रेल्वेमार्ग
2 ‘ते’ ट्विट भोवलं, L’Oreal च्या जाहिरातीतून मुस्लिम मॉडेलची माघार
3 २२ वर्षांपासून वाळूच्या किल्ल्यात राहणाऱ्या ‘राजा’ला पाहिलात का?
Just Now!
X