27 September 2020

News Flash

viral : प्रेयसीसाठी फुलांचा नाही तर चिकन नगेट्चा गुच्छ

तिला फूलं आवडत नाही

मलिना येथे राहणा-या अॅनिकाला तिचा प्रियकर रॅको याने फुलांचा गुच्छ नाही तर चक्क चिकन नगेट्सचा गुच्छ देऊन खूष केले आहे. (छाया सौजन्य : Annika Aguinaldo/Twitter)

व्हॅलेंटाईन विक सुरु आहे. आज काय रोझ डे, उद्या प्रपोज डे, परवा चॉकलेट डे अशी वेगवेगळ्या डेजची लांबलचक यादीच सुरू आहे. त्यामुळे आपल्या प्रेयसीला खूष करण्यासाठी कोणी रंगीबेरंगी फुलांचा तर कोणी गोड गोड चॉकलेट्चा गुच्छ भेट म्हणून देत आहे. पण एका मुलाने मात्र आपल्या प्रेयसीला फूलं आवडत नाहीत म्हणून चक्क चिकन नगेट्सचा गुच्छ दिला आहे. थोडं विचित्र वाटत असलं तरी हटक्या प्रकारे त्याने आपल्या गर्ल फ्रेंडला खूश केलं आहे. त्याची आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्याची कल्पना नेटीझन्सना एवढी आवडली की आता याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वाचा : …आणि अंध पत्नीवरचे प्रेम ‘फुलत’ गेले

मलिना येथे राहणा-या अॅनिकाला तिचा प्रियकर रॅको याने फुलांचा गुच्छ नाही तर चक्क चिकन नगेट्सचा गुच्छ देऊन खूष केले आहे. असा गुच्छ याआधीच नक्कीच कोणाला मिळाला नसेल. त्यामुळे हटके अंदाजात आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करणा-या या प्रियकराचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अॅनिकाने आपल्याला फुलं अजिबात आवडत नाही असे रॅकोला सांगितले होते. फूल आणि चॉकेलटमध्ये फारशी रस न घेणारी अॅनिका इतर मुलींपेक्षा थोडी हटके आहे हे रॅकोच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने मॅक डोनोल्डच्या आऊटलेट्समधून तिच्यासाठी चिकन नगेट्सचा गुच्छ बनवून घेतला. या जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवर अपलोड केलेला हा फोटो नऊ हजारांहूनही अधिक वेळा रिट्विट केला गेला.

वाचा : व्हॅलेंटाईन्स डे व्हिडिओ: इंग्लिश येत नाही? हा फंडा वापरा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 3:26 pm

Web Title: boyfriend surprises girlfriend with a bouquet of chicken nuggets
Next Stories
1 अर्णब गोस्वामींचा बरखा दत्त यांना टोमणा
2 केमिकल फॅक्टरीला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्याने घेतले कायद्याचे शिक्षण
3 ‘बाथरोब’मधला फोटो व्हायरल झाल्याने डोनाल्ड ट्रम्प भडकले
Just Now!
X