भारताप्रमाणेच ब्राझिलमध्ये देखील करोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाउन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी नागरिकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलसोनारो यांनी एक मिटिंग आयोजित केली होती. व्हिडीओ कॉलव्दारे आयोजित केलेल्या या मिटिंगला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी हजर होती. मात्र व्हिडीओ मिटिंगदरम्यान अशी एक घटना घडली ज्यामुळे या मिटिंगची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. ब्राझिलमधील एक न्यायाधीश या मिटिंगमध्ये उघडेबंब अवस्थेत पाहिले गेले.

अवश्य पाहा – आणखी एका ‘पॉर्नस्टार’ची बॉलिवूडमध्ये एण्ट्री; राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात करणार काम

अवश्य पाहा – ‘त्या’ कृतीमुळे तमन्नाची उडवली जातेय खिल्ली; व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार या न्यायाधीशांचं नाव कार्मो अँटोनीओ डिसुजा असं आहे. ते ५७ वर्षांचे आहेत. ब्राझिलमधील न्यायव्यवस्थेबद्दल बोलण्यासाठी ते या मिटिंगला हजर राहणार होते. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा लॅपटॉप रिस्टार्ट झाला. लॅपटॉप सुरु होईपर्यंत त्यांनी अंघोळी करण्याचा विचार केला. दरम्यान त्यांनी आपले कपडे उतरवले होते. तेवढ्यात लॅपटॉप सुरु होऊन ते वेब कॅमेराव्दारे राष्ट्रपतींच्या मिटिंगमध्ये जोडले गेले. त्याचवेळी त्यांचं उघडेबंब शरीरदेखील या लाईव्ह ब्रॉडकास्ट मिटिंगमध्ये दिसू लागले. नेमकं त्यांच्यासोबत झालं काय हे समजेपर्यंत या व्हिडीओचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.

आपली चुकी समजल्यानंतर कार्मो अँटोनीओ डिसुजा यांनी एका व्हिटीओव्दारे देशवासीयांची माफी मागितली. तसेच ही घटना का घडली याचे स्पष्टीकरण दिले. अशीच काहीशी घटना काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारासोबत घडली होती. हा पत्रकार आपल्या घरातून बातम्या सांगत होता. त्याने वरती कोट घातला होता. परंतु खाली मात्र एक लहानशी शॉर्ट पँट घातली होती. त्याच्या लहान मुलाने मागून येऊन त्याला घाबरवले तेवढ्यात भीतीने तो उभा राहिला आणि त्याचा असा गंमतीशीर अवतार लाईव्ह ब्रॉडकास्ट झाला होता.