24 November 2020

News Flash

VIDEO …जेव्हा साधूचा वेश धारण करुन ब्रेट ली मुंबईतील मुलांबरोबर क्रिकेट खेळतो!

लांब केस, लांब दाढी, भगवा कुडता परिधान करून ब्रेट क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी पार्कात पोहोचला. आश्चर्य म्हणजे त्याला एकानंही ओळखलं नाही.

ब्रेट लीनं लहान मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.

ऑस्ट्रेलियन संघाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीनं किक्रेटमधून संन्यास घेतलाय, सध्या कमेंटेटरच्या भूमिकेत असेलल्या ४१ वर्षीय ब्रेट लीला क्रिकेट खेळण्याचा मोह अनावर झाला. तेव्हा संन्यासाचा वेश धारण करून ब्रेट क्रिकेटची पंढरी शिवाजी पार्कात पोहोचला. मैदानात खेळणाऱ्या मुलांसोबत ब्रेट लीनं एक प्रँक केला. लांब केस, लांब दाढी, भगवा कुडता परिधान करून ब्रेट तिथे पोहोचला. आश्चर्य म्हणजे त्याला एकानंही ओळखलं नाही.

ब्रेट लीनं लहान मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद क्रिकेटच्या पंढरीत घेतला. अखेरपर्यंत एकालाही ब्रेट लीला ओळखता आलं नाही. शेवटी ब्रेटनं, त्याने लावलेले खोटे केस आणि दाढी काढली तेव्हा ब्रेटलीला पाहून लहान मुलांच्या आनंदाला पारावर उरला नाही. मुलं अक्षरश: त्याच्याभोवती आनंदानं नाचू लागली. काहींनी तर ऑटोग्राफसाठी बॅटही पुढे केली. ‘स्टार स्पोर्ट’नं ब्रेट लीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 11:44 am

Web Title: brett lee disguised himself as an old man to play cricket with children
Next Stories
1 पत्रकार म्हणाला, गौतम गंभीर ‘दहशतवादी’; चाहत्यांनी ट्विटर सोडण्याचा दिला सल्ला
2 ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे लक्ष्य!
3 सुमित, निखट, हिमांशू यांना सुवर्ण
Just Now!
X