News Flash

VIRAL VIDEO : आलिया दारात अजब वरात…

भारतीय जोडप्याने असा केला लग्नमंडपात प्रवेश

ऑकलंडमध्ये राहणा-या एका भारतीय जोडप्याने असा काही लग्नमंडपात प्रवेश केला की सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतातील लग्न काही हटकेच असतात नाही का? कोण लग्नात काय करेल सांगता येत नाही. कुठे हळदीत दारू पिऊन व-हाडी झिंगत असतात तर कुठे नागिन डान्स करून वरातच गाजवून सोडतात. असे काहीना काही व्हिडीओ सोशल मीडि्यावर व्हायरल झालेले आपण पाहिले असतीच. आपलं लग्न बुवा असं दणक्यात झालं पाहिजे की सा-या गावात हा चर्चेचा विषय बनला पहिजे! असे कोणत्या जोडप्याला नाही वाटणार? मग त्यासाठी कितीही खर्च करायलाही काही जण मागे पुढे पाहत नाही. लग्न सोहळ्यात नवरा मुलाची आणि मुलीची एण्ट्री एकदमच भारी असायला पाहिजे नाही का? आता घोडीवर चढून किंवा आलीशान गाडीत बसून नव-या मुलाने मंडपात प्रवेश केलेला तुम्ही पाहिला असेल. पण एका जोडप्याने यापेक्षाही काहीतरी हटके केले आहे.

वाचा : धतिंग, धतिंग, धतिंग नाच!

वाचा : पठ्ठ्याने समुद्राखाली केलं लग्न!

ऑकलंडमध्ये राहणा-या एका भारतीय जोडप्याने असा काही लग्नमंडपात प्रवेश केला की सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लेहंगा घातलेली नवरी आणि शेरवानी घातलेल्या नव-याने घोडीवरून नाही तर हॉवरबोर्डवरून लग्नमंडपात प्रवेश केला. थोडक्यात चाक असलेल्या इलेक्ट्रॉनिक बोर्डवरुन हो! लग्नमंडपात केलेला प्रवेश हा लोकांना इतका आवडला की या व्हिडिओला खूपच प्रसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी युट्युबवर एक व्हिडिओ ट्रेंड होत होता. या व्हिडिओमध्ये नवरी एकटीच लग्नाच्या पेहरावात नाचत होती..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 7:04 pm

Web Title: bride and groom enter their wedding on hoverboards
Next Stories
1 VIRAL VIDEO: काॅपी करायची तर अशी (नाही)
2 VIRAL : शाहरुखच्या सेल्फीमध्ये असणारी ‘ती’ सध्या काय करतेय?
3 हा खोटं बोलतोय भाऊ!!
Just Now!
X