25 January 2021

News Flash

Video: याला म्हणतात Work From Wedding! स्वत:च्याच लग्नात स्टेजवर लॅपटॉप घेऊन बसली नववधू

नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

वर्क फ्रॉम होम वगैरे आम्हाला नसतं रे असं काही महिन्यापूर्वी म्हणणारे अनेकजण मागील तीन ते चार महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे घरुनच काम करत आहेत. अनेकांना आता या वर्क फ्रॉम होमचा कंटाळा आला आहे. त्याचवेळी या वर्क फ्रॉम होमवर अनेक मजेदार व्हिडिओ आणि मिम्स व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एक नववधू आपल्या लग्नाच्या दिवशी थेट स्टेजवरुन लॅपटॉपवर काम करताना आणि फोनवर बोलताना दिसत आहे. अनेकांनी ही तरुणी ऑफिसचं काम करत असल्याचं म्हटलं आहे. शेजारी शेरवानी, फेटा अशा पेहरावात बसलेला पती आणि लेहंगा परिधान करुन लॅपटॉपवर काम करणाऱ्या तरुणीची हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दिनेश जोशी यांनी ट्विटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. “तुम्हाला घरी बसून कामाचा ताण आला असेल तर हे बघा” अशा कॅप्शनसहीत दिनेश यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवरा मुलगा मुलगी काय काम करत आहे हे तिच्या लॅपटॉप स्क्रीनमध्ये डोकावून बघत आहे.

If you think you are under work pressure then watch this… via WA @hvgoenka pic.twitter.com/odbFTxNofh

— Dinesh Joshi. (@dineshjoshi70) July 3, 2020

या व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट कमेंट्स देत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

१) नवरा म्हणत असेल

२) काय बॉस आहे

३) पक्का भारतीय

४) लोगो उलटा का?

५) हे उद्योग प्रभाव पाडण्यासाठी

६) सेल्समध्ये असणार ही

७) नातेवाईकांना टाळण्यासाठी उत्तम पर्याय

८) हे करत असणार ती…

९) झूम कॉलवरील लग्न असणार

१०) तिला आवाज नसेल येत

११) बॉसला आमंत्रण नसणार

१२) लॉकडाउन इफेक्ट आहे हा

या व्हिडिओला ७३ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ बघून काय वाटलं कमेंट करुन नक्की कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 12:46 pm

Web Title: bride captured working on laptop on wedding day scsg 91
Next Stories
1 Coronavirus Parties… अमेरिकेत जीवाशी खेळणारा ट्रेण्ड; जाणून घ्या नक्की काय होतं पार्टीत
2 धक्कादायक! मुस्लीम मुलीच्या ऑर्डरवर स्टारबक्सने नावाऐवजी लिहिलं ‘ISIS’; मानवी हक्क आयोगाकडे तक्रार
3 पत्र पोहचवण्यासाठी रोज १५ किमी पायपीट करणारा पोस्टमन ३० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त
Just Now!
X