News Flash

फिटनेस फ्रिक नवरीचा हटके अंदाज लेहंग्यावरच मारले पुशअप्स; व्हिडीओ व्हायरल

नवरीला मेकअप नाही तर फिटनेस महत्त्वाचा आहे असं या व्हिडीओमधून दिसून येत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

bride does pushups
लेहंगा घालून पुशअप्स करणारी नवरी (Photo: @aan4490/Instagram)

नवरी म्हटलं की छान तयार होऊन, सुंदर कपडे घालून मिरवणारी मुलगी डोळ्यासमोर येते. आपल्या खास दिवशी नवरीचं आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष असतं. आपल्या मेकअपकडे तर नवरीबाईचं जास्त लक्ष असतं. सोशल मीडियावर या नववधूंचा कधी डान्स व्हायरल होतो तर कधी फोटोशूट. पण या नवरीने याहूनही वेगळ करून सगळ्यांना हैराण केलं आहे. या नवरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नवरीने लग्नाच्या आधी तयार होत असतानाच लेहंग्यावरच पुशअप्स मारले. नवरीचा हा व्हिडीओ नेटीझन्सला खूप आवडला आहे. व्हिडीओवर त्यांनी केलेल्या कमेंट्स वरून हे सहज लक्षात येत आहे.

नक्की काय आहे व्हिडीओमध्ये?

लग्नासाठी  नवरी छान तयार झाली आहे. तिने छान दागिने घातले आहेत हेअरस्टालही केली आहे. तिचा अगदी शेवटचा टचअप सुरु असतानाचं या नवरीने मेकअपचा टचअप करणं सोडून पुशअप्स मारायला सुरुवात केली. आणि तिने हे पुशअप्स चक्क लेहंग्यावरच केले. एकदम शांत लाजत मुरडत बसण्याऐवजी नवरीला पुशअप्स करताना पाहून उपस्थितांनीही तिला प्रोत्साहीत केलं आहे. या व्हिडीओला गाण्याचीही साथ लाभली आहे. यातून या नवरीला मेकअप नाही तर फिटनेस महत्त्वाचा आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.

कोण आहे ही नवरी?

हा व्हिडीओ आना अरोरा या मुलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. तिच्या बायो नुसार ती एक मॉडेल आणि आहार तज्ञ आहे. तिच्या अकाऊंटच्या पोस्ट बघून तीला जिम करायला आवडतं हे सुद्धा दिसून येत आहे. आणि ती पर्सनल ट्रेनिंगसुद्धा देते हेही तिच्या अकाऊंटवरच्या बायोमधून माहिती होतं.

नेटीझन्सच्या प्रतिकिया

फिटनेस फ्रिक नवरीचा हा हटके अंदाच नेटीझन्सला चांगलाच पसंतीच पडत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. या व्हिडीओला आत्तापर्यंत ८.२ दशलक्ष लोकांनी बघितलं आहे. अवघ्या ३० सेकंदाच्या या व्हिडीओला लोकांनी खूप पसंती दर्शवली आहे. या नवरीचे ८० हजारांहून जास्त फॉलोअर्स आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by aana arora (@aan4490)

या व्हिडीओप्रमाणेच तिच्या लग्नातील अन्य व्हिडीओलाही नेटीझन्सनी पसंती दर्शवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2021 5:26 pm

Web Title: bride doing pushups in lehenga on wedding day video goes viral ttg 97
Next Stories
1 अखेर २७ वर्षानंतर बिल गेट्स आणि मेलिंडा विभक्त; घटस्फोटावर शिक्कामोर्तब
2 १ वर्षानंतर झेवियर्सचा ‘मल्हार फेस्टीव्हल’ पुन्हा भेटीला
3 Quarantine Tourism: हजारो भारतीय पर्यटकांमुळे सर्बियाचा फायदा
Just Now!
X