17 July 2019

News Flash

VIDEO: …अन् क्षणार्धात काळू नदीवरील पूल जमीनदोस्त

शहापूर व मुरबाड या दोन तालुक्यांना जोडणारा दहिवली गावानजीकचा पूल

काळू नदीवरील पूल जमीनदोस्त

शहापूर व मुरबाडला जोडणारा काळू नदीवरील धोकादायक पूल काल दुपारच्या सुमारास पाडण्यात आला. गेल्या दीड वर्षांपासून धोकादायक पुलांच्या यादीत असणारा हा पूल बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली स्फोट करून पाडण्यात आला. हा पूल उडवण्याचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हॉट्सअप आणि फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे.

शहापूर व मुरबाड या दोन तालुक्यांना जोडणारा दहिवली गावानजीकचा काळू नदीवरील पूल क्षितिग्रस्त झाल्याने येथून वाहतूक करू नये असे आदेश वर्षभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. सार्वजनिक बांधकाम आण‌ि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वादात शहापूर तालुक्यातील काळू नदीच्या ह्या पुलाची दुरुस्ती रखडली होती. रखडलेली दुरूस्ती आणि होणारी गैरसोय यामुळे गेल्या वर्षभरापासून वाहतुकीसाठी बंद असलेल्या या पुलावरून लहान गाड्यांनी पुन्हा वाहतूक सुरू केली होती. त्यामुळे या धोकादायक पुलावर एखादी दुर्घटना होण्याची भीतीही स्थानिकांकडून व्यक्त केली जात होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारा हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या रस्त्याचे काम सुरू करण्याचा निर्यण घेतला आहे. मात्र हा पूल दुरुस्त न करता पूर्णतः नवीन बांधण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळेच काल संध्याकाळच्या सुमारास हा पूल स्फोटकाच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आला.

आता याच पाडलेल्या पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्यात येणार असून त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सरळगाव- किन्हवली- शेणवा या मार्गे प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

First Published on December 4, 2018 9:35 am

Web Title: bridge on kalu river connecting murbad shahapur demolished