News Flash

धमक्यांना भीक न घालता ‘त्या’ मुस्लिम तरूणाने केला समलैंगिक विवाह

तो जीव द्यायला निघाला होता

जाहेदने सीनशी लग्न केलंच आणि धमक्यांना आपण घाबरत नाही दाखवून दिलं. ( छाया सौजन्य :डेली मेल)

आपण अनेक क्षेत्रांत प्रगती केली असली तरी काही गोष्टी आपल्याकडे खुल्या मनाने स्वीकारल्या जात नाही. त्यात समलैंगिक संबधांसारखे विषय आलेच. अनेक देशात समलैंगिक संबधांना कायदेशीर मान्यता असली तरी काही देशांत मात्र समलैगिंक संबध ठेवणं एखाद्या भयंकर गुन्ह्यापेक्षा कमी नाही. पण हेच बंध झुगारून बांगलादेशमधल्या मुस्लिम तरूणाने सगळ्यांचा रोष पत्करून समलैंगिक विवाह केलाय. तेव्हा समलैंगिक विवाह करणारा तो ब्रिटनमधला पहिला मुस्लिम ठरलाय असं ‘डेली मेल’नं म्हटलं आहे.

वाचा : ऐकलं का? १५ वर्षांच्या मुलाने केले ७3 वर्षांच्या वृद्धेशी लग्न

जाहेद चौधरी हा मूळचा बांगलादेशी असला तरी ब्रिटनमध्ये वाढलेला. तो समलैंगिक आहे. मुस्लिम धर्मांत समलैंगिक संबधांना मान्यता नाही, असं घरचे आणि नातवाईक मंडळी त्याला सतत सांगत होते. समलैंगिक संबधांचं खूळ त्याच्या डोक्यावर चढलं आहे. तेव्हा हे खूळ उतरवण्यासाठी त्यांने धार्मिक गोष्टीत लक्ष घालावं, अशी सक्तीही त्याच्यावर करण्यात आली. या सगळ्या कोंडीला कंटाळून जीव देण्याचा विचार जाहेदच्या मनात आला होता. एके दिवशी तो किनाऱ्यावर रडत बसला होता. तेव्हा एका तरूणाने त्याला हटकले. हाच तरूण पुढे जाऊन जाहेदचा आयुष्याचा जोडीदारही बनला. हा तरूण होता सीन रोगन. जाहेद आणि सीन नुकतेच विवाहबंधनात अडकले. दोघांनी पारंपरिक वेश परिधान करून लग्न केलं. तेव्हा समलैंगिक लग्न करणारा जाहेद हा पहिला मुस्लिम तरूण ठरलाय.

वाचा : मोदींसाठी कायपण! मोदीभक्ताने या कारणासाठी मोडले लग्न

पण अशाप्रकारे लग्न केल्याने या दोघांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. अनेकांनी जाहेदला जीवे मारण्याची धमकीही दिली. खुद्द जाहेदने देखील समलैंगिकाच्या होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण सीनमुळे तो वाचला होता. अनेकदा जाहेदवर मुस्लिम तरूणांनी हल्लाही केला होता. इतकंच नाही तर त्याला मशिदीमध्ये येण्यापासून देखील बंदी घालण्यात आली. एवढा विरोध सहन करून जाहेदने सीनशी लग्न केलंच आणि धमक्यांना आपण घाबरत नाही दाखवून दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 10:00 am

Web Title: britains first ever gay muslim wedding
Next Stories
1 ऐकलं का? १५ वर्षांच्या मुलाने केले ७३ वर्षांच्या वृद्धेशी लग्न
2 मोदींसाठी कायपण! मोदीभक्ताने या कारणासाठी मोडले लग्न
3 राजनाथ सिंहच्या ट्विटवर भडकले लोक, त्यापेक्षा मुस्लिम धर्म स्विकारू
Just Now!
X