राजस्थानच्या वाळवंटी भागात पाण्याचे मोल हे सो-या हि-यांपेक्षाही अधिक आहे. इथे एक थेंब पाण्याचे मोल काय असू शकते हे वेगळे सांगायला नको. या भागातील अनेक गावांना मुबलक पाणी मिळावे म्हणून एक दाम्पत्य गेल्या ३० वर्षांपासून धडपतय. या दाम्पत्यांची वेगळी अशी ओळख करून देण्याचे कारण असे की हे दाम्पत्य मुळचे ब्रिटनचे आहे पण राजस्थानमधील गावांना पाणी मिळावे यासाठी ते अनेक मोहिमा राबवत आहेत.

वाचा : गरिबांना अन्न मिळावे म्हणून २३ वर्षांच्या तरुणाची धडपड

७९ वर्षांचे निकोलस ग्रे आणि त्यांची पत्नी गेल्या कित्येक दशकापासून भारतात ये जा करत आहेत. राजस्थानमधील गरिब आणि वंचित समाजासाठी मुकलब पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ते धडपडत आहेत. वेल्स फॉर इंडिया अंतर्गत गावात विहिरी खोदणे आणि या जल संवर्धन करण्यासाठी गावक-यांना प्रोत्साहित ते करत आहेत. राजस्थानमधील महिलांना पाण्याच्या शोधात दूर दूर पर्यंत भटकावे लागते. महिलांचा दिवस लांबून पाणी आणण्यातच वाया जातो. पाण्याच्या आभावी प्राण्यांना माणसांना आपल्या जीवाला मुकावे लागले. हे सारे निकोलस आणि त्यांची पत्नी मेरी यांनी खूप जवळून पाहिले. म्हणूनच राजस्थानमधील गावात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी या दाम्पत्यांनी पुढाकार घेतला आहे. गावातील लोकांना पाण्याचे आणि जलसंवर्धनाचे महत्त्व ते पटवून देतात.

वाचा : शौचालयाचा वापर करा, दरमहा २५०० कमवा!