तिचं वय अवघं १४ वर्षं…ती इयत्ता नववीमध्ये शिकते…इतक्या लहान वयात तिने ‘टीन फेस ऑफ युरोप’ हा अॅवॉर्ड मिळवला आहे. डिस्नेलॅंड येथील सौंदर्यस्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. ही स्पर्धा आठवडाभर चालते. या स्पर्धेत तिने चीन, अमेरिका, ब्राझिल येथील मुलींना हरविले असून जगभरातील एकूण ३० जणांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.

रुबी हिल असे या तरुणीचे नाव असून अशाप्रकारच्या स्पर्धेत तिने पहिल्यांदाच सहभाग घेतला होता. आपल्या बहिणीच्या वाढदिवसाठी दिड वर्षापूर्वी तिने एक फोटोशूट केले होते. तेव्हापासून कॅमेरासमोर थांबणे तिला आवडू लागले आणि आपला चेहरा फोटोजेनिक असल्याचे तिच्या लक्षात आल्याचे तिने सांगितले.

यानंतर मिस वर्ल्ड बनण्याचे आपले स्वप्न असल्याचे रुबीने एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ती म्हणते या अॅवॉर्डमुळे मला धक्का बसला आहे. माझे सगळे फोटो पाहून मी खूप रडले. माझ्या शाळेतील मित्र-मैत्रीणींनाही मी जिंकल्यामुळे खूप आनंद झाला आहे. या सौंदर्य स्पर्धेमुळे मी काहीही करु शकते असा आत्मविश्वास आला आहे.